थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे शरीराला होणारे फायदे
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो. थंडीसह इतर सर्वच ऋतूंमध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वातावरणात बदल झाल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अनेक बदल केले जातात. वातावरण थंड असल्यामुळे कुठेही बाहेर फिरायला जाताना अनेक गोष्टी घेऊन बाहेर जावे लागते. थंडीच्या दिवसांमध्ये आहारात गरम आणि उष्ण पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे शरीर आतूनसुद्धा उष्ण होते. अनेक लोक दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर अंघोळ करतात.अंघोळ केलं;यामुळे शरीर स्वच्छ राहते. पण काहींना थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा थंड पाण्याची अंघोळ करण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये गरम पाण्याने अंघोळ केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. (फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
शरीर स्वच्छ करण्यासाठी नियमित अंघोळ करणे आवश्यक आहे. नियमित अंघोळ केल्यामुळे शरीराला आणि मनाला शांती मिळते. शिवाय आरोग्य सुधारण्यास मदत होते. कामावरून थकून आल्यानंतर किंवा इतर वेळी बाहेर फिरून आल्यानंतर कामाचा थकवा घालवण्यासाठी अंघोळ करणे आवश्यक आहे. त्यामुळे रोजच्या दैनंदिन जीवनात थंड किंवा गरम पाण्याने अंघोळ करू शकता.त्यामुळे आज म्ही तुम्हाला हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केल्यावर शरीरावर नेमके काय परिणाम होता, याबद्दल सांगणार आहोत.
थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. थंड पाण्याची अंघोळ केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. शिवाय यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि नंतर सगळीकडे पसरतात. ज्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. कामाचा थकवा किंवा आळस घालवण्यासाठी थंड पाण्याची अंघोळ करावी. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल. थंड पाण्याची अंघोळ केल्यामुळे खराब झालेला मूड सुधारून तणाव आणि नैराश्य कमी होते. केस आणि त्वचा स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करावा. यामुळे त्वचा आणि केसांचे नुकसान होत नाही. त्वचा चमकदार होऊन केस मजबूत होतात.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे शरीराला होणारे फायदे
गरम पाण्याची अंघोळ करणे सगळ्यांचं आवडते. कारण थंडीच्या दिवसांमध्ये थंड पाण्याची अंघोळ केल्यामुळे सर्दी किंवा खोकला लागण्याची शक्यता असते. त्यामुळे थंड वातावरणात गरम पाण्याची अंघोळ करावी. थंड पाण्याची अंघोळ केल्यामुळे शरीरातील हाडांमध्ये वात निर्माण होण्याची शक्यता असते. शिवाय हृद्यासंबंधित समस्या असलेल्या लोकांनी थंड पाण्याची अंघोळ करू नये. थंड पाण्याची अंघोळ केल्यामुळे हायपोथर्मिया होऊ शकतो. शिवाय संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना थंड पाण्याची अंघोळ करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.