
विवाहित महिला मंगळसूत्र घालतात. नवरा आणि बायोकोच्या सुखी संसाराचे हे एक लक्षण मानले जाते. महिलांचे या मंगळसूत्राशी एक अतुट नाते आहे. मंगळसूत्राशिवाय कोणत्याही विवाहित महिलेला अपूर्ण मानले जाते. धर्माशास्त्रात याचा भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. मंगळसूत्रातील काळे मोती आणि सोने हे शिव-पार्वतीच्या बंधनाचे प्रतीक मानले जातात.
मंगळ सुत्रात असणारे काळे मोती हे शिवाचे आणि माता पार्वतीचे सोन्याचे प्रतीक मानले गेले आहे. वैवाहिक जीवनाला वाईट नजरेपासून वाचवण्यास हे मनी मदत करतात असे मानले जाते. त्यामुळे प्रत्येक विवाहित महिलेने मंगळसूत्र परिधान करावे असे शास्त्र सांगते. मंगळसूत्र नेहमी शुभ मुहूर्तावर खरेदी करावे. त्याचबरोबर नवीन मंगळसूत्रही चांगल्या मुहूर्तावर परिधान करावे. दुसऱ्या महिलेचे मंगळसूत्र घातल्याने पती-पत्नीमध्ये मतभेद आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता असते.
याशिवाय मंगळसूत्रात काळे मोती पुरेशा प्रमाणात वापरावेत. काही प्रमाणात सोन्याच वापर असावा. असे मंगळसूत्र पती-पत्नी दोघांचेही नशीब घेऊन येते. [blurb content=””]