'या' गंभीर आजारांमुळे वाढू शकतो मोतीबिंदूचा धोका
हल्ली बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो, तसाच परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर सुद्धा दिसून येतो. कोरोनानंतर संपूर्ण जगभरात अनेक नवनवीन बदल झाले. या काळात ऑफिसची काम, शिक्षण इत्यादी गोष्टी पूर्णपणे डिजिटली करण्यात आल्या. मात्र याचा गंभीर परिणाम हळूहळू डोळ्यांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. तासनतास एकजागेवर बसून ऑफिसची काम, कॉलेजमधील लेक्चर इत्यादी गोष्टींमुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडले आहे. डोळ्यांसंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्यासाठी डोळ्यांना चष्मा लावले आवश्यक आहे. काम करताना किंवा बाहेर फिरताना चष्मा लावल्यामुळे डोळ्यांचे नुकसान होत नाही.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
डोळ्यांसंबंधित उद्भवणारा गंभीर आजार म्हणजे मोतीबिंदू. मोतीबिंदू झाल्यानंतर डोळ्यांचे नुकसान होऊ लागते. तासनतास बसून मोबाईल किंवा टीव्ही पाहिल्यामुळे डोळ्यांचे आरोग्याचे गंभीर नुकसान होते. मोतीबिंदू झाल्यानंतर ऑप्टिक नर्व्हचे नुकसान होते. ही मज्जातंतू डोळ्यांकडून मेंदूकडे संकेत पाठवते. जगभरात अनेक लोक मोतीबिंदू या डोळ्यांसंबंधित गंभीर आजारामुळे त्रस्त आहेत.हा आजार हळूहळू वाढू लागल्यानंतर काही दिवसांनी डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम करतो. त्यामुळे योग्य वेळी डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला कोणत्या आजारांमुळे मोतीबिंदू वाढण्याची शक्यता असते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टी करणे टाळावे. याशिवाय शरीरात उच्च रक्तदाब वाढल्यानंतर डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांवर ताण येण्याची शक्यता असते. तसेच ऑप्टिक मज्जातंतूचे पोषण करणाऱ्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. यामुळे मोतीबिंदू होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.
काहींना सतत डोकेदुखणे किंवा मायग्रेनची समस्या जाणवू लागते. मायग्रेनचा त्रास असलेल्या व्यक्तींना काचबिंदू होण्याची शक्यता असते. त्यामुळे मायग्रेनची समस्या उद्भवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. मायग्रेनचा त्रास असलेल्या व्यक्तींचे ऑप्टिक नर्व्हमध्ये रक्त प्रवाह कमी होऊन इतर गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
उच्च मायोपिया झाल्यानंतर डोळ्याचा आकार बदलतो, ज्यामुळे डोळयातील पडदा आणि ऑप्टिक मज्जातंतू मोठ्या प्रमाणावर ताणले जातात. ज्यामुळे ऑप्टिक नर्व्हवर दबाव वाढून मोतीबिंदूचा धोका वाढतो. त्यामुळे उच्च मायोपियाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी नियमित डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर मधुमेह होण्याची शक्यता असते. मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात जास्त साखरेचे सेवन करू नये. यामुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते. शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. शिवाय यामुळे डोळ्यांची दृष्टी सुद्धा जाण्याची शक्यता असते.