घराच्या सुरक्षेसाठी फॉलो करा 'या' टिप्स
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान त्याच्या अभिनयामुळे सगळीकडे प्रसिद्ध आहे. मात्र आज पहाटे सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी मुंबईमधील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चोरट्यांकडून झालेल्या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपासाला सुरुवात केली आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात तो गंभीररित्या जखमी झाला आहे. तसेच त्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील सर्वच भागांमध्ये चोरी आणि हल्ला करण्याची प्रकरणे वाढली आहेत. रात्रीच्या वेळी घरात घुसून चोर घरातील दागिने, पैसे इत्यादी गोष्टी चोरी करून घरातील कोणत्याही व्यक्तीवर हल्ला करून पळ काढत आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घराच्या सुरक्षेची कशी काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा चोरांपासून तुमच्या घराचा बचाव करू शकता.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
घराच्या सुरक्षेसाठी घरात सेंसर अलार्म बसवून घेणे आवश्यक आहे. यामुळे घरात चोर किंवा इतर कोणतीही अनोळखी व्यक्ती आल्यास लगेच समजून येईल. सेंसर अलार्म घराच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्वाचा आहे. यामुळे घरातील महागड्या वस्तू, दागिने इत्यादी गोष्टींची चोरी होणार नाही.
बाहेर जाताना किंवा इतर वेळी घरी असल्यानंतर दरवाजा लॉक करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा घरात चोर किंवा अनोळखी व्यक्ती सहज घुसू शकता. घरातील बाहरेच्या दरवाजाला किंवा खिडक्यांना मजबूत लॉक बनवून घ्यावे, ज्यामुळे घरात चोरी किंवा इतर धोकादायक घटना घडणार नाहीत. त्यामुळे घरात मेटल किंवा लोखंडाचे लॉक वापरावे.
घराच्या आतील आणि बाहेरच्या सुरक्षेसाठी घरात कॅमेरा बसवून घेणे आवश्यक आहे. कॅमेरा असल्यामुळे घरात कोणतीही अज्ञात व्यक्ती आल्यास लगेच समजून येईल. घरात कॅमेरा लावल्यामुळे चोरांच्या हलचालींवर लक्ष ठेवता येईल.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
घरातील प्रत्येक रूममध्ये स्मार्ट लाइट्स वापर करावा. यामुळे चोर आतमध्ये आल्यानंतर लगेच समजून येईल. घरात किंवा बाहेरच्या भागात अंधार न सोडता तुम्ही घरात घुसलेल्या चोरांवर लक्ष ठेवू शकता. याशिवाय रात्रीच्या वेळी घरात लाईट्स चालू ठेवाव्यात. त्यामुळे चोरांना घरात कोणी तरी आहे असे वाटेल.