गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी 'या' सोप्या टिप्स
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल इन्फेक्शन वाढू लागते. इन्फेक्शन वाढू लागल्यानंतर आरोग्यावर त्याचा परिणाम दिसू येते. गढूळ पाणी, उघड्यावरचे अन्नपदार्थ इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसून आल्यानंतर साथीचे आजार होण्याची शक्यता असते. साथीचे आजार प्रामुख्याने अशुद्ध पाण्यामुळे होतात. शुद्ध पाणी नदी नाल्यांमध्ये किंवा धरणाच्या पाण्यात मिक्स झाल्यानंतर पाणी हळूहळू गढूळ होऊन जाते. हेच पाणी मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्ये पाईपलाईनमधून सोडले जाते. हेच पाणी अनेकदा घरांमध्ये आल्यामुळे गढूळ पाण्याचे सेवन केल्यानंतर आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. गढूळ पाण्याचे सेवन केल्यामुळे पोट दुखी, उलट्या, जुलाब इत्यादी आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पाणी शक्यतो गाळून किंवा उकळून प्यावे.
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी पाणी स्वच्छ असणे फार गरजेचे आहे. कारण दूषित पाणी शरीरात गेल्यानंतर आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. तसेच निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी शरीराला पाणी आवश्यक आहे. पण तेच पाणी जर दूषित असेल तर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला प्युरिफायरचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये पाणी स्वच्छ कसे करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे उपाय केल्यास पाणी स्वच्छ होऊन आरोग्याला हानी पोहचणार नाही.
हे देखील वाचा: पायांच्या तळव्यांची आग होते? मग पायांना थंडावा देण्यासाठी करा ‘हे’ उपाय, जळजळपासून मिळेल आराम
पूर्वीच्या काळापासून पाणी स्वच्छ करण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर केला जात आहे. मातीच्या भांड्यातील पाणी चवीला आणि आरोग्यसाठी अतिशय गुणकारी आहे. पूर्वीच्या काळी कुठेच प्युरिफायर वैगरे काहीच नव्हतं. अशावेळी लोक पाणी स्वच्छ करण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर करत होत्या. मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी थंडगार राहते. मातीच्या भांडयातील पाणी टाकून त्यात काही कोळशाचे तुकडे टाकून ठेवा. त्यानंतर काहीवेळ ठेवून झाल्यावर मातीच्या भांड्यातील पाणी कापडाच्या सहाय्याने बांधून घ्या. यामुळे पाणी स्वच्छ होईल.
हे देखील वाचा: फोन बॉक्स फेकून देण्याऐवजी, अशा प्रकारे पुन्हा वापरुन बघा
हल्ली अनेक ठिकाणी पाणी स्वच्छ करण्यासाठी ब्लीचचा वापर केला जातो. पण ब्लीच वापरताना काही गोष्टींची योग्य ती काळजी घ्यावी. ब्लीच वापरताना त्यामध्ये सुगंध, रंग किंवा इतर कोणत्याही गोष्टी असू नयेत. पाणी स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी पाणी गरम करून घ्या. त्यानंतर पाण्यात 1 किंवा 2 थेंब ब्लीच टाकून ठेवा.