पायांची जळजळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय
शरीरामध्ये उष्णता वाढल्यानंतर हातापायांमध्ये जळजळ आणि आग होण्यास सुरुवात होते. शरीरात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्णता वाढते असे अनेकांना वाटते. पण असे नाही. सर्वच ऋतूंमध्ये शरीरात उष्णता निर्माण होते. पायांची जळजळ आणि आग होण्यास सुरुवात झाल्यानंतर दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच चालताना किंवा रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर पायांची जळजळ अधिक होते. पायांची जळजळ होण्यास सुरुवात झाल्यानंतर शरीरात काही लक्षणे दिसून येतात. ताणतणाव, रक्ताभिसरणाची कमतरता, शरीरात निर्माण झालेली पोषण आहाराची कमतरता इत्यादी गोष्टींमुळे पायांची जळजळ होण्यास सुरुवात होते. पायांची जळजळ होण्यास सुरुवात झाल्यानंतर जास्त प्रमाणात चालल्यानंतर पाय दुखू लागतात. यावर आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यानंतर पायांची जळजळ कमी होण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock)
मेहंदी थंड असते. तसेच मेहंदीमध्ये थंड गुणधर्म आढळून येतात. अनेकदा हातावर किंवा पायावर मेहंदी काढल्यानंतर शरीरात थंडावा जाणवतो. मेहंदी शरीरातील उष्णता कमी करून शरीर थंड ठेवण्याचे काम करते. पायांच्या तळव्यांची आग होत असल्यास मेहंदी पावडर घेऊन त्यात पाणी टाकून घट्ट भिजवून घ्या. त्यानंतर तयार केलेला लेप पायांना लावून काहीवेळ तसाच ठेवा. यामुळे तुमच्या पायांची जळजळ कमी होऊन आराम मिळेल. मेंहदी लालवल्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो.
हे देखील वाचा: डार्क सर्कल्समुळे डोळ्यांचं सौंदर्य कमी झालं आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय करून पहा, डोळे होतील चमकदार
पायांची होणारी जळजळ कमी करण्यासाठी पायांना दह्याचा लेप लावा. दह्यामध्ये असलेले गुणधर्म पायांची जळजळ कमी करण्यास मदत करतात. तसेच दह्याचे सेवन केल्यामुळे पोटातील जळजळ कमी होऊन आराम मिळतो. पायांच्या तळव्यांची होणारी आग थांबवण्यासाठी दह्याचा लेप करून पायांना लावा. यामुळे पायांना थंडावा मिळेल.
हे देखील वाचा: रक्तातील घाण कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी सकाळी उपाशी पोटी करा ‘या’ पाण्याचे सेवन
काहीवेळ जास्त चालल्यामुळे किंवा उंच टाचेच्या चपला घातल्यामुळे पायांची जळजळ होऊ लागते. पायांची होणारी जळजळ थांबवण्यासाठी तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा. यामुळे पायांचे दुखणे थांबून आराम मिळेल. तिळाचे तेल त्वचेमध्ये खोलवर जाते आणि आराम मिळतो.