
फोटो सौजन्य - Social Media
झोप आयुष्याचा महत्वाचा घटक आहे. आपल्या शरीराची कार्यक्षमता आपण किती झोप घेतो? यावर नक्कीच अवलंबून असते. जर आपली झोप पूर्ण असेल तर आपल्या शरीरामध्ये वेगळीच उर्जा खेळत असते, ज्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आपली कार्यक्षमता टिकून राहते. मनामध्ये कोणतीही नकारात्मकता राहत नाही. झोप पूर्ण असल्याने आपण सतत ताजेतवाने राहतो. आपल्यामध्ये एक वेगळीच स्फूर्ती जाणवते. एकंदरीत, झोप पूर्ण होणे शरीराच्या आरोग्यासाठी फार महत्वाचे असते. झोप पूर्ण असेल तर निश्चितच आपले आरोग्य चांगले राहते. परंतु, अर्धवट झोप आपली कार्यक्षमता तर बिघडवतेच. याहून मोठा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
हे देखील वाचा : वारंवार आजारी पडताय? शरीरातील लक्षणांपासून ओळखा आरोग्याची स्थिती
हृदयाचा विकार असणाऱ्या रुग्णांसाठी झोप फार महत्वाची असते. कारण अर्धवट झोपेचा मोठा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर जाणवतो. त्याचबरोबर आपल्या व्यस्थ जीवनशैलीत हरपून गेलेले नोकरदारवर्ग या त्रासाला बळी पडण्याची फार शक्यता असतात. या लोकांमध्ये झोप अर्धवट राहण्याचे प्रमाण जास्त असते. ज्याचा परिणाम अर्थातच त्यांच्या कार्यावर तर होतोच, त्याचबरोबर त्यांना जिविध विकारांना सामोरे देखील जावे लागते. यामध्ये हृदयाचा विकार अग्रेसर आहे. त्यामुळे आपल्या व्यस्थ जीवनशैलीतून थोडासा वेळ स्वतःसाठी काढून तो दिवसभर राबणाऱ्या शरीराला द्या. याने आपली कार्यक्षमता तर वाढेलच किमान शरीराचे आरोग्य तरी नीट राहील.
जर तुम्हाला तुमच्या व्यस्थ जीवनशैलीतून झोप पूर्ण करण्यासाठी वेळ काढता येत नाही असेल तर तुम्ही चिनी लोकांचा हा एक आदर्श मात्र घेतला पाहिजे. चीन देशातील लोकं त्यांच्या आरोग्याचा फार विचार करतात. त्यांच्या आरोग्यासाठी ते नेहमी काळजीपूर्वक असतात. त्यांच्यासाठी झोप आयुष्याचा फार महत्वाचा घटक असतो. तेथेही फार मोठा समूह नोकरदारवर्ग आहे परंतु ते त्यांच्या सुट्टीचा फायदा पुरेपूर घेतात. एकंदरीत, आठवडाभर राबून चिनी लोकं त्यांची अर्धवट राहिलेली झोप सुट्टीच्या दिवशी पूर्ण करतात. याला स्लिप डेट प्रक्रिया म्हणतात.
हे देखील वाचा : इंटरमिटेंट फास्टिंग की किटो डाएट, Weight Loss साठी काय करावे फॉलो
आपणही आपल्या सुट्टीच्या दिवसात झोपेची राहिलेली कसर पूर्ण करू शकतो. याने 28% हृदय विकाराचा तसेच धक्का येण्याची शक्यता कमी होते. यावर क्लीव्हलँड क्लिनिकने संशोधन केले आहे. क्लीव्हलँड क्लिनिकच्या संशोधनानुसार, अपूर्ण किंवा कमी झोप शरीराला कमकुवत बनवू शकते. याचा महिलांवर जास्त परिणाम होतो, ज्यामुळे त्यांच्या हृदयाचे आरोग्य बिघडू शकते. अशा स्थितीत स्लिप डेट ही पद्धत फायदेशीर ठरू शकते.