फोटो सौजन्य - Social Media
मानवाचे आयुष्य हे व्यस्थ आहे. मग त्या जीवाचे वय कितीही असो, याने काही फरक पडत नाही. लहान वयात अभ्यासाचा भार असतो तर वाढत्या वयात जबाबदाऱ्यांचा तणाव असतो. अगदी मानवाच्या मृत्यूपर्यंत या जबाबदाऱ्या मानवाचा काही पाठलाग सोडत नाहीत. मानवाचे संपूर्ण आयुष्य तणावामध्ये असते. अशा परिस्थितीतीमध्ये स्वतःला फिट ठेवणे हे एका कलेपेक्षा कमी नाही.
महत्वाचे म्हणजे प्रत्येकालाही कला अवगत नाही आहे. आपल्या व्यस्थ जीवनशैलीतून स्वतःसाठी वेळ काढणे. त्यामध्ये स्वतःच्या आरोग्य सुधारण्यावर भर देणे, हे प्रत्येकाला जमत नाही. परंतु, ज्याला जमते त्याचे पुढील आयुष्य फार सुंदर राहते. काही तरुणांना असे वाटते कि त्यांना काही त्रास नाही म्हणजे ते एकदम निरोगी आहेत. ते सगळ्यांपेक्षा निरोगी आयुष्य जगत आहेत असा त्यांना सतत जाणवत असते. परंतु, प्रत्येकवेळी हे बरोबर असेल असे नाही. आपण किती निरोगी आहोत? याची जाणीव आपले शरीर काही लक्षणांनी करून देत असते.
हे देखील वाचा : इंटरमिटेंट फास्टिंग की किटो डाएट, Weight Loss साठी काय करावे फॉलो
आपले पाचनतंत्र आपल्या निरोगीपणाची खात्री करून देण्यात अग्रेसर असतो. काही खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर किंवा जेवण केल्यानंतर पोट फुगणे तसेच एसिडिटीचा त्रास होत असेल तर नक्कीच तुमचे आरोग्याची स्थिती वाईट आहे. खाद्यपदार्थांचे पचन बरोबर न होणे म्हणजेच आरोग्य सुधारण्याची गरज आहे. तसेच निरोगी व्यक्तीला झोपेच्या समस्या उद्भभवत नाहीत. जर तुम्हाला झोपण्यात त्रास होत असेल किंवा बरोबर झोप लागत नसेल तर नक्कीच तुमच्या आरोग्याची स्थिती वाईट आहे. तुम्ही आरोग्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.
आपल्या उत्सर्जनाच्या स्थितीतून आपण आपल्या आरोग्याची स्थिती माहिती करून घेऊ शकतो. जर युरीन हलक्या पिवळ्या किंवा साफ रंगाचं आहे याच अर्थ कि आपले आरोग्य चांगले आहे. परंतु युरीन गाढ्या रंगाची आहे तर सावध राहण्याची गरज आहे. आरोग्याची स्थिती ओळखण्याची दुसरी पद्धत म्हणजे जर आपल्या शरीरावरील जखम ठीक होण्यास जास्त वेळ घेत आहे तर आपले आरोग्य ठीक नाही आहे. आपले स्वास्थ्य तेव्हाच ठीक असते जेव्हा आपल्या शरीरावरील जखमा बऱ्या होण्यास फार काळ नाही घेत. अशा पद्धतीने तुम्ही आपल्या आरोग्याची स्थिती ओळखू शकता आणि वेळीच सावध राहून आरोग्य सुधारण्यावर नियंत्रण करू शकता.






