लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीला सासरच्या कुटुंबासोबत जुळवून घेणे कठीण जाते. घरात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असल्याने सगळ्यांसोबत जुळवून घेणं थोडं कठीण होऊन जात. पती सोबत नाते संबंध चांगले झाल्यानंतर तुम्ही तुमच्या भावना पतीला शेअर करू शकतात. पण अनेक घरांमध्ये तेवढी अनुकूल परिस्थिती नसते. काहींना घरातील सासू किंवा वाहिनीसोबत पटवून घेणं थोडं कठीण जात. त्यांच्यासोबत चांगले नातेसंबंध जुळत नाहीत. अनेकदा घरात यावरून भांडण देखील होतात. पण घरातील हेच नातेसंबंध व्यवस्थित ठेवल्यास घरात भांडण होत नाहीत. सासरच्या मंडळींसोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा.(फोटो सौजन्य- Istock)
घरातील भांडणांमध्ये पतीला आणू नये:
सासरी घरात भांडण झाल्यानंतर पतीला त्या भांडणांमध्ये आणू नये. कारण ते तुमच्या जोडीदाराचे पालक आहेत. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. घरात भांडण झाल्यानंतर हळू आवाजात बोला. मोठ्या आवाजात घरातील लोकांसोबत भांडल्यानंतर वाद आणखीन वाढण्याची शक्यता असते. कमी आवाजात तुमच्या जोडीदारासमोर तुमची बाजू ठामपणे मांडा. आयुष्य जगत असताना घरात अशी छोटी मोठी भांडण होतच असतात. त्यामुळे ही भांडण व्यस्थित शांतपणे कशी हाताळता येतील याकडे लक्ष द्या.
[read_also content=”पपईच्या पानांचा रस रोज प्यायल्याने शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे https://www.navarashtra.com/lifestyle/healthy-benefits-of-papaya-leaves-juice-544128.html”]
मानसिक आरोग्याची काळजी घ्या:
घरात भांडण झाल्यानंतर अनेकदा मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते. मानसिक तणाव वाढल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम आरोग्यावर दिसू लागतात. आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे सासरी जर तुमची सतत भांडण होत असतील तर शांतपणे बसून यावर तोडगा काढा. यामुळे भांडण वाढणार नाहीत.
आरोग्याची काळजी घ्या:
लग्न करून सासरी गेलेल्या प्रत्येक मुलीला नवीन कुटुंबामध्ये रुळण्यासाठी थोडा वेळा लागतो. त्यामुळे सासरच्या व्यक्तींना तिला समजून घेतले पाहिजे. लग्न झाल्यानंतर सासरच्या मंडळींची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण ते सुद्धा म्हतारपणाच्या वाटेवर असतात. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घ्यावी.