प्रेम दिवस म्हणजेच आपल्या खास व्यक्तीकडे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं… तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! पण हे खरं आहे की, प्रेम व्यक्त करणं तितकंच अवघड असतं. याबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या आहेत अभिनेते राजेश श्रीरंगपुरे यांनी.
कॉलेज मध्ये असताना कळलं आनि त्यावेळेस आमच्या कॉलेज मध्ये संपूर्ण व्हॅलेन्टाईन वीक सेलेब्रिट करायचे.
त्यात rose day साठी सगळे खुप उत्सुक असायचे.
कॉलेजमध्ये असताना माझं एका मुलीवर खूप प्रेम होतं आणि मी ठरवलं की आपण त्या मुलीला विचारायचं पण, माझं काही धाडस होईना . तर मी माझ्या एका मित्राला बोललो की, तू माझ्या कडून तिला गुलाबाचं फुल द्यायचं आणि सांग की माझं तिच्यावर प्रेम आहे. पण तिथे मात्र वेगळीच गम्मत झाली. त्याने तिला ते फुल दिलं आणि म्हणाला की, राजेश तुझ्यावर प्रेम करतो पण भाऊ म्हणून. तिने ते फुल घेतलं पण चिडून ती निघून गेली.
आणि माझं ते प्रेम अव्यक्त आणि अधुरच राहीलं.
प्रेम हे निस्वार्थी असायला हवं आणि प्रेमात कुठल्या कंडिशन्स असायला नको. आणि मला वाटत अव्यक्त प्रेम असेल तर त्यात एक वेगळीच मजा असते , तुम्ही प्राण्यांना बघा काही बोलत नसतानाही त्यांच्यात प्रेम असतच की, प्रेमाची बातच काही और आहे. तो स्पर्श , नजर चोरून बघणं त्यात एक वेगळीच गम्मत आहे आणि माझं प्रेम माझ्या बायकोवर आहे.
मला वाटत प्रेम प्रेम असत पण त्या काळी बऱ्याचदा प्रेम व्यकत करता यायचं नाही आणि आता जग खूप वेगाने पळतयं. हल्ली आपण सोशल मीडियावरही कमी काळातच प्रेम व्यक्त करतो.
नुकतचं लता दिदींचं निधन झालयं. त्यांच्यात आठवणींनीना उजाळा देण्यासाठी एखाद त्यांचं रोमँटिक गाणं
ही बातमी ऐकून दुःखाचा डोंगर कोसळला होता. माझी एक विनंती आहे की, जसा ध्रुवतारा आहे तसंच एखाद्या दिसणाऱ्या ताऱ्याला लतादीदींच नाव द्यावं अशी माझी खूप इच्छा आहे. खरतर मी इतका मोठा नाहीए पण मी त्यांच एक गाणं गाण्याचा प्रयत्न करतो. व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने “एक प्यार का नगमा है” हे गाणं गावून त्यांनी लताजींना भावपूर्ण श्रद्धांजली दिली.
व्हॅलेन्टाईन वीकमध्ये सगळ्यात जास्त कोणता दिवस सेलेब्रेट करायला आवडेल.
प्रोपोज डे आणि मी माझ्या मुलीला प्रपोज करीन.
कोणतं गिफ्ट घ्यायला जास्त आवडेलं.
गुलाबालचं फुल घ्यायला कारण मला फुलं खूप आवडतात.
मराठी आणि बॅालीवूड इंडस्ट्रीमध्ये iconic couple म्हणून कोण आवडतं?
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर आणि बॅालीवूडमध्ये शाहरुख खान आणि गौरी.
फेव्हरेट लव्ह स्टोरी कोणती आहे?
हिररांझा मला अप्रतीम लव्ह स्टोरी वाटते.
व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने कोणता संदेश द्याल.
मित्रहो निस्वार्थी प्रेम करा. पण प्रेमामुळे कोणाला त्रास होऊ नये ह्याची काळजी घ्या. आणि व्यक्त करा तुमचं प्रेम.
प्रेमाची व्याख्या बदलतेय. सगळ्यांशीच flirt करायचं असा सध्याच्या प्रेमाचा नवा फंडा आहे. हल्ली ब्रेकअपची पण जोरदार पार्टी दिली जाते. खरं सांगायचं तर प्रेम अशी भावना आहे की, ते व्यक्त करण्यासाठी 14 फेब्रुवारीची म्हणजे व्हॅलेंटाईन डे ची खास वाट बघण्याची गरज नाही. पण त्यातही एक वेगळी गंमत अनुभवायला आणि रोजच्या रूटीनमधून बाहेर येऊन हलकं फुलकं होऊन मजा करायला हे डेज साजरे करायला देखील काहीच हरकत नाही.