घरामध्ये सगळ्या वस्तूंसाठी वास्तूच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असते. घड्याळ योग्य़ दिशेला लावले गेले, तर तुमच्या घरात नेहमी सुख समृद्धी राहील आणि सकारात्मक ऊर्जा येईल. ( फोटो सौजन्य- freepik)
वास्तुशास्त्राच्या सिद्धांतानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडतो. योग्य दिशेने ठेवलेल्या गोष्टींचा सकारात्मक परिणाम होतो, तर चुकीच्या दिशेने ठेवलेल्या गोष्टींचाही नकारात्मक परिणाम होतो. यी सर्व वस्तूंमधील एक वस्तू आपल्या सगळ्याच्या घरात असते ती म्हणजे भिंतीवरील घड्याळ. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तू तज्ज्ञ पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्या सांगण्यानुसार, भिंतीवरील घड्याळ नेहमी योग्य दिशेने आणि घरामध्ये योग्य ठिकाणी लावावे. कारण, भिंतीवरील घड्याळ घरामध्ये ऊर्जा प्रवाहित करते. जेणेकरून आपले करिअर प्रगतीचा मार्ग बनते आणि संपत्ती येते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरावयची असेल, तर घड्याळ योग्य दिशेला लावावे. भिंतीवरील घड्याळ लावण्यासाठी योग्य दिशा आणि जागा कोणती ते जाणून घेऊया.
[read_also content=”केळी घरी आणल्यानंतर लगेच खराब होत असतील तर दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स वापरा https://www.navarashtra.com/lifestyle/important-tips-to-keep-bananas-fresh-545534.html”]
भिंतीवरील घड्याळ लावण्यासाठी योग्य दिशा
उत्तर दिशा
ही दिशा संपत्तीची देवता कुबेरचीही दिशा मानली जाते. त्यामुळे वास्तूनुसार या दिशेला भिंत घड्याळ लावल्यास सुख, समृद्धी आणि आर्थिक प्रगती होते.
याशिवाय घराच्या दिवाणखान्यात उत्तर दिशेला भिंत घड्याळ लावल्यास त्याची पूर्ण ऊर्जा संचारते. हे प्रगती आणि विकासदेखील संप्रेषण करते.
पूर्व दिशा
शास्त्रानुसार पूर्व दिशा ही देवराज इंद्राचीही दिशा मानली जाते. या दिशेला घड्याळ लावल्यास आरोग्य सुधारते. मुख्यतः ही दिशा बेडरूम आणि स्टडी रूमसाठी विशेषतः फायदेशीर आहे. कारण इथे शैक्षणिक यश मिळते.
पश्चिम दिशा
असे मानले जाते की, पश्चिम दिशा ही जलदेवता वरुण देवाला समर्पित आहे. जर तुम्ही या दिशेला भिंतीवर घड्याळ लावले तर तुमचे घड्याळ सुरळीत चालू ठेवणे तुमचे कर्तव्य आहे कारण या ठिकाणी सदोष घड्याळामुळे शांतता आणि स्थिरता बिघडू शकते.
चुकूनही या दिशेला घड्याळ ठेवू नका
वास्तूनुसार दक्षिण दिशेला भिंतीवर घड्याळ लावू नये. कारण, ही दिशा यमाची दिशा मानली जाते आणि या दिशेला घड्याळ लावणे अशुभ मानले जाते. कारण यामुळे तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.
याशिवाय दक्षिण-पश्चिम दिशेला भिंतीवरील घड्याळ लावणे टाळावे. कारण ही दिशा सकारात्मक ऊर्जेला बाधा आणते.