वास्तुशास्त्र (Vastu Shastra) घराच्या रचनेविषयी खूप काही सांगतं. रचना योग्य असेल तर घरात नेहमी सकारात्म उर्जा येते. त्यातही घराच्या मुख्य दरवाज्याच्या रचनेवर विशेष भर दिला जातो. मुख्य दार आकर्षक, सुंदर आणि मजबूत तर असलंच पाहिजे, पण त्याचबरोबर ते वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार असलं तर त्यामुळे घरात समृद्धी नांदते असं म्हटलं जातं. घराचं मुख्य द्वार सर्व सुख देणारं असतं असं मानलं जातं. हे घराचं मुख्य अंग आहे. जर या दाराची जागा व्यवस्थित, वास्तुशास्त्रानुसार असेल तर अनेक दोषांचं आपोआपच निवारण होतं आणि सुख-समृद्धी, आरोग्य, धनधान्य आणि यश-कीर्ती मिळते असं म्हटलं जातं. याबद्दलची अधिक माहिती ‘झी न्यूज’ने प्रसिद्ध केली आहे.
मुख्य दरवाज्यातून करकर आवाज येत असेल किंवा तो तुटलेला असेल तर लगेचच तो दुरुस्त करा. घर कितीही चांगलं असलं आणि मुख्य दारच नीट उघडलं जात नसेल किंवा जमिनीला घासून ते उघडावं लागत असेल तर अशा घरांमध्ये नोकरीशी संबंधित अडचणी येतात असं मानलं जातं. असे दरवाजे प्रमोशनमध्येही अडथळे निर्माण करतात असं म्हटलं जातं.
दररोज मुख्य दरवाजा स्वच्छ केला गेला पाहिजे. हा दरवाजा म्हणजे घराचं तोंड आहे असं समजलं पाहिजे. आपण आपलं तोंड जसं स्वच्छ ठेवतो, तशाच प्रकारे दारही स्वच्छ केलं पाहिजे. हे द्वार स्वच्छ ठेवल्यानं घरात कधीही पैशांची कमतरता जाणवत नाही असं मानलं जातं. घराच्या या मुख्य दरवाज्यातूनच सुखं आणि दु:खंही घरात येतात. घराच्या दरवाजातून दु:खं, नकारात्मकता यांचा प्रवेश होऊ नये यासाठी दरावाज्याची स्वच्छता होणं खूप गरजेचं आहे.
घराच्या आकारामानाप्रमाणे दरवाजाचा आकार असावा. घराचा दरवाजा खूप मोठा असेल तर त्या घरात पैसा टिकत नाही, सतत काही ना काही खर्च उद्भवत राहतात असं मानलं जातं. अगदी छोटा दरवाजा असेल तर नोकरी किंवा व्यवसायात चांगल्या संधी मिळण्यात अडचणी येतात, असं म्हणतात.
दरवाज्याच्या कोयंड्यातून आवाज येत असेल किंवा त्याचा रंग उडाला असेल तर त्यामुळे घरात आजारपणं येतात असा समज आहे. घराचा मुख्य दरवाजा उघडताना दरवाज्यातून करकर अवाज येऊ नये यासाठी काळजी घ्या. या सगळ्या गोष्टींकडे नीट लक्ष दिलं तर घरात सुख-समृद्धी आणि आरोग्य नांदतं. कडीकोयंड्याच्या जोडणीमध्ये काही बिघाड झाला असेल, तर घराच्या मालकाला त्रास सहन करावा लागतो असं म्हणतात.
हे दार व्यवस्थित नसेल, तर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. दरवाजा वाकडा-तिकडा असेल तर ते अशुभ मानलं जातं. यामुळे मानसिक संतुलन बिघडू शकतं असं मानलं जातं. त्यामुळे कौटुंबिक शांततेवर, स्वास्थ्यावर परिणाम होतो. दरवाजा घराच्या आत लटकलेला असेल तर ते त्रासदायक असतं आणि दरवाजा बाहेर लटकलेला असेल तर त्या घरात राहणाऱ्यांना सतत प्रवास करावा लागतो. दरवाजा उघडताना किंवा बंद करताना तो अडकणं अजिबात चांगलं नसतं.
ज्या घरांमध्ये असा पारदर्शक दरावाजा असतो तिथली सकारात्मकता संपते असं मानलं जातं. तसंच ज्या गोष्टी घराच्या आतच राहणं गरजेचं आहे त्याही घराच्या बाहेर जातात असं म्हणतात.
असं केल्यानं देवतांचा अनादर होतो आणि ते नाराज होतात. त्यामुळे घराच्या संपन्नतेत कमतरता येते असं मानलं जातं. मुख्य दरवाजावर स्वस्तिक, कलश किंवा नमस्कार केलेले हात अशी चित्रं लावावीत. दरवाजावर अशी चिन्हं लावणं शुभ असतं.