
विराट आणि अनुष्काच्या घराची सफर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे अनेकांचे आदर्श जोडपे आहे. अकायच्या जन्मापासून विराट आणि अनुष्का हे जास्त काळ लंडनमध्ये राहिले आणि आता ते तिथेच शिफ्ट होणार आहेत अशा बातम्याही येत होत्या. मात्र नुकतेच विराट आणि अनुष्का आपल्या अलिबागमधील नव्या घराच्या फेऱ्या मारताना दिसत आहेत. अनेकदा गेट वे ऑफ इंडियावरून दोघांना अलिबागला जाताना पाहिले जाते.
अनुष्का आणि विराटचे अलिबागमधील घर हे निसर्ग, आधुनिकता आणि परंपरेचा एक सुंदर मेळ आहे. तुमच्यासाठी आम्ही खास हे फोटो शेअर करत असून विराट आणि अनुष्काच्या घराचे इंटिरिअर नक्की कसे आहे ते जाणून घ्या. तुम्हीही जर एखादा आपला बंगला बांधण्याचा विचार करत असाल तर हे इंटिरिअर डिझाईन नक्कीच तुमच्या कामी येईल. विरूष्काचा हा अलिबागचा बंगला आतून नक्की दिसतो तरी कसा? (फोटो सौजन्य – @glamblitz_ instagram)
हसतीखेळती हवा
लिव्हिंग रूमचे इंटिरिअर
हसतीखेळती हवा राहवी अशा पद्धतीने या घरातील इंटरिअर करण्यात आले आहे. लिव्हिंग रूममध्ये मार्बल असून स्किन कलरचे सोफा सेट ठेवण्यात आले आहेत आणि ठिकठिकाणी इनडोअर प्लांट ठेऊन घराला अधिक शोभा देण्यात आली आहे. तर याशिवाय वेगवेगळे सुंदर आणि आकर्षक असे पेंटिंगही लावण्यात आले आहे
कमालीची रंगसंगती आणि क्लासी वूड फर्निचर, असा आहे सोनाक्षीचा 11 कोटीचा फ्लॅट
नैसर्गिक प्रिंटेड कव्हर्स
उत्कृष्ट रंगसंगतीचा मेळ
घरातील सोफा सेट्स अत्यंत निसर्गाशी मिळतेजुळते राहावे असा रंग निवडण्यात आला असून उशांची कव्हर्सदेखील पानाफुलांनी प्रिंट केलेली अशी वापरण्यात आली आहेत. तर टीपॉयवर व्यवस्थित पुस्तकं लावण्यात आली आहेत. डोळ्याला सुंदर आणि आकर्षक दिसेल अशी रंगसंगती इंटिरिअरमधून दिसून येत आहे.
बेडरूमचे साधे इंटिरिअर
बेडरूममध्ये येणारा सूर्यप्रकाश
बेडरूमध्ये अत्यंत साधे इंटिरिअर करण्यात आले असून लाकडी कपाटं ठेवण्यात आली आहेत आणि याशिवाय टीव्हीदेखील लावण्यात आला आहे. तसंच बेडरूममध्ये सूर्याचा प्रकाश येईल अशा तऱ्हेने खिडक्या लावण्यात आल्या आहेत. तसंच बसण्यासाठी लाकडी खुर्ची आणि त्यासह मॅच होणारी आरामदायी उशी ठेवण्यात आली आहे.
इनडोअर प्लांट्स
इनडोअर प्लांट्सचा इंटिरिअरमध्ये वापर
घरात ठिकठिकाणी इनडोअर प्लांट्स ठेवण्यात आले असून निसर्गाचा जास्तीत जास्त समावेश करून घेण्यात आला आहे. याशिवाय अनेक ठिकाणी उत्कृष्ट मार्बल्स वापरून अत्यंत रॉयल लुक देण्यात आलाय. तुम्हीही जर घराला रॉयल लुक देण्याचा विचार करत असाल तर हे इंटिरिअर डिझाईन तुमच्यासाठी नक्कीच क्लासी ठरू शकते
रात्रभर पाण्यात भिजवा मेथी-धण्याच्या बिया, 21 दिवसात कोलेस्ट्रॉल नसांतून खेचून काढेल आयुर्वेदिक उपाय
बाथरूममध्ये मार्बल
स्टायलिश बाथरूम
याशिवाय बाथरूमदेखील स्टायलिश असून संपूर्ण मार्बलचा वापर करण्यात आलाय. बाथरूममध्येही लहान लहान इनडोअर प्लांट्स ठेवण्यात आले आहेत आणि एक मोठा आरसा ज्यामध्ये सकाळी उठल्यानंतर योग्य पद्धतीने चेहरा पाहता येईल अशा स्वरूपात डिझाईन करण्यात आलाय. तसंच बाथरूममध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी व्यवस्थित मॅनेज करण्यात आल्या आहेत
निसर्गाशी संबंधित फ्रेम्स
बेडरूमचे इंटिरिअर
याशिवाय दुसऱ्या बेडरूममध्येही अत्यंत साधेपणा असल्याचे दिसून येत आहे. लाकडी फर्निचरचा वापर आणि अगदी लाईट अशा बेडशीट्स आणि निसर्गाशी संबंधित प्रिंटेड कुशन कव्हर्स तसंच फ्रेम्सदेखील निसर्गाशी संबंधित लावण्यात आल्या आहेत. निसर्गाच्या कुशीत असेच हे घर असून आतूनही त्याला संपूर्ण नैसर्गिक टच देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय