विटामिन बी१२ च्या कमतरतेमुळे मुलांवर होणारा परिणाम (फोटो सौजन्य - iStock)
मुलांच्या वाढीसाठी अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आवश्यक असतात, त्यातील एक जीवनसत्व म्हणजे गर्भधारणेदरम्यान आईमध्ये विटामिन बी 12 ची कमतरता. बरेचदा जन्मानंतरही मुलांमध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता आढळते. हे एक आवश्यक जीवनसत्व आहे जे शरीरातील लाल रक्तपेशी, डीएनए, चेतापेशी तयार करण्यात मदत करते.
विटामिन बी12 च्या कमतरतेमुळे मुलांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. विटामिन बी 12 ची कमतरता असेल तर मुलांमध्ये कोणती लक्षणे दिसतात ते तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. डॉ. गौरव जैन, वरीष्ठ सल्लागार, बालरोग आणि निओनॅटोलॉजी, आकाश हेल्थकेअर, नवी दिल्ली यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
गॅस्ट्रोइंटेस्टाईयनल समस्या
मुलांना होणाऱ्या समस्या (फोटो सौजन्य – iStock)
मुलांमध्ये विटामिन बी12 च्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता, उलट्या आणि जुलाब यांसारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वजन कमी होणे, चालण्यात अडचण येणे, आळस यांसारख्या समस्या दिसून येतात. त्यामुळे वेळीच मुलांना लहानपणापासून विटामिन बी12 स्रोत असणारे पदार्थ खाऊ घालावेत.
न्यूरोलॉजिकल समस्या
मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या विकासासाठी विटामिन बी12 आवश्यक आहे. अशा परिस्थितीत विटामिन बी12 ची कमतरता न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण करू शकते. यामुळे कमकुवत स्मरणशक्ती आणि हायपोटोनियासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे हाताला आणि पायांना मुंग्या येणे आणि सुन्नपणा येणे जाणवू शकतो.
मुलांमध्ये सतत चिडचिड
मुलांमध्ये सतत होणारी चिडचिड (फोटो सौजन्य – iStock)
शरीरात विटामिन बी12 च्या कमतरतेमुळे मुलांमध्ये चिडचिड, मूड बदलणे आणि इतर अनेक वागणुकीमध्ये बदल होऊ शकतात. लाल रक्तपेशींच्या विकासासाठी विटामिन बी12 आवश्यक आहे म्हणून त्याच्या कमतरतेमुळे मुलामध्ये ॲनिमिया होऊ शकतो. यासाठी तुम्ही पालक म्हणून वेळीच लक्ष द्यावे.
विटामिन बी12 कमतरता कशी कमी करावी?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही विटामिन बी12 युक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. यासाठी तुम्ही चिकन, मांस, मासे, अंडी यांसारख्या पदार्थांचे सेवन करावे ज्यामध्ये विटामिन बी12 चांगल्या प्रमाणात असते. जर मूल मांसाहार करत नसेल तर तुम्ही त्याला सोया आणि बदामाचे दूध, टोफू आणि काही फळे खायला लावू शकता. याव्यतिरिक्त, स्तनपान करणाऱ्या महिलांनी त्यांच्या बाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे विटामिन बी12 सेवन करण्याची आवश्यकता आहे.