फोेटो सौजन्य - Social Media
वारानुसार विविध रंगाचे कपडे घालणे कधीही चांगले असते. ठराविक वाराला ठराविक रंग परिधान केल्याने सुख समृद्धीचे दार उघडतात. मला शांती मिळते तर नशीबाला भोग नाही तर छप्पन भोग नशिबी येतात. एकंदरीत, भाग्य उजळते असे अनेकांचे म्हणणे असते. आपणही असे अनेक वेळा ऐकले असेल कि वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केले पाहिजेत. याला कारण ही तसे आहे. म्हणतात कि, आपण परिधान केलेल्या रंगांचा ग्रहांच्या ऊर्जेशी संबंध असतो. ठरविक वाराला ठराविक रंग घातल्याने शरीरात शांती, ऊर्जा आणि आत्मविश्वासाच्या वाढीला चालना मिळते.
हे देखील वाचा : प्रतीक बब्बरने गर्लफ्रेंडसोबत शेअर केले रोमँटिक फोटो
असे म्हणतात कि सोमवारी पांढरेशुभ्र कपडे परिधान करणे चांगले असते. पांढरा रंग शांतीचा प्रतीक असतो. या शांतीच्या पार्टीअंकाला परिधान केल्याने बुद्धी आणखीन जागृत होते. विचार करण्याची क्षमात आणखीन दृढ होते. शरीराच्या अन्तरसौन्दर्यात एक निखळ सौंदर्य वाढते. सोमावरी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने संपूर्ण दिवस शरीरात एक सकारात्मकता असते. त्याचबरोबर मंगळवारी लाल रन्गाचे कपडे परिधान करणे कधीही उत्तम ठरू शकते. हा रंग मंगल या ग्रहाशी जोडलेला आहे. हिम्मत आणि एकाग्रतेचा प्रतीक असलेला रंग आपल्या शरीराला वीर भावना प्रदान करतो. सतत आपल्याला प्रेरणा देतो. मंगळवारी लाल रंगाचे कपडे परिधान केल्याने मन अगदी खुश राहते.
नावाप्रमाणेच, बुधवार हा दिवस बुद्ध ग्रहाशी संबंध दाखवतो. या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे कधीही उत्तम ठरू शकते. निसर्ग तसेच विकासाला दर्शवणारा हिरवा रंग आपल्या रचनात्मक शैलीचा वाढीला कारणीभूत ठरतो. तसेच जीवनात बॅलेन्स आणि हार्मोनीला वाढवतो. गुरुवार हा वार सौरमंडळातील गुरूशी जोडलेला आहे. या दिवशी पिवळा रंग परिधान करणे खूप चांगले ठरू शकतात. हा रंग आपल्या शिकण्याच्या शैलीला आणखीन मजबूत बनवतात. एकंदरीत, आपल्याला गोष्टी समजणे आणखीन सोपे होऊन जाते. शुक्रवारी गुलाबी रंगचे कपडे परिधान करावे. असे केल्याने दया आणि भावना यामधील संतुलन बनून राहते. सुंदरतेला दर्शवणार हा रंग व्यक्तीलाही सुंदर व आकर्षक बनवते.
शनिवार हा दिवस शनी ग्रहाशी संबंध दर्शवतो. यादिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे सोयीस्कर ठरू शकते. हा रंग व्यक्तीला आपल्या ध्येयावर लक्ष टिकवून ठेवण्यात मदत करतो. तर रविवारी भगवा किंवा सुवर्ण रंगाचे कपडे परिधान करावे. हा रंग यश तसेच आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. हा रंग व्यक्तीच्या आत्मविश्वासाला बूस्ट करतो.