बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बर आणि त्याची लाँग टाईम गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीचे सध्या रोमँटिक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रतिक आणि प्रिया नोव्हेंबर २०२३ पासून एकत्र आहेत. काही तासांपूर्वीच अभिनेत्याने सोशल मीडियावर गर्लफ्रेंडसोबतचे काही रोमँटिक ब्लॅक अँड व्हाईट फोटोज् शेअर केले आहेत. त्यांच्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. प्रतिक आणि प्रियाच्या लाँग टाईम रिलेशनला लवकरच चार वर्ष पूर्ण होणार आहेत.
प्रतीक बब्बरने गर्लफ्रेंडसोबत शेअर केले रोमँटिक फोटो
'सिकंदर' फेम प्रतीक बब्बर सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याची लाँग टाईम गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
प्रतीक बब्बर आणि प्रिया बॅनर्जीच्या लाँग टाईम रिलेशनला लवकरच चार वर्ष पूर्ण होतील.
प्रिया बॅनर्जी एक प्रसिद्ध कॅनडनियन अभिनेत्री असून तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
'हमें तुमसें प्यार कितना' या चित्रपटामधून प्रियाला बॉलिवूडमध्ये विशेष ओळख मिळाली.
२६ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रतिकने प्रिया बॅनर्जीला लग्नासाठी मागणी घातली होती. तेव्हापासून दोघं एकत्र आहेत.