वजन कमी करण्यासाठी फॉलो करा सोप्या टिप्स
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. सतत जीम करणे, आहार तज्ज्ञांकडून घेतलेले डाईट फॉलो करणे इत्यादी अनेक उपाय केले जातात. पण यामुळे अनेकदा वजन आणखीन वाढू लागते. काही लोक वजन कमी करण्यासाठी गोळ्या देखील खातात. पण कालांतराने या गोळ्यांमुळे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी योग्य तो आहार आणि योगासने केल्यास वजन कमी होते. पण काही लोक वजन कमी करण्यासाठी चापश खाणं सोडून देतात. नाश्ता, दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात चपाती खाणे बंद केले जाते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी चपातीच्या पीठात कोणते पदार्थ मिक्स करून खावे, याबद्दल सांगणार आहोत.चपातीमध्ये हे पदार्थ मिक्स करून खाल्ल्याने वजन वाढणार नाही.(फोटो सौजन्य-istock)
वजन कमी करण्यासाठी चपातीच्या पीठात मिक्स करा ‘हे’ पदार्थ
अंबाडीच्या बिया आरोग्यसाठी गुणकारी आहेत.या बियांमध्ये फायबर आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळून येते, जे वाढलेले वजन कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. अंबाडीच्या बिया स्वच्छ करून नंतर मिक्सरमधून बारीक पावडर तयार करून घ्या. त्यानंतर ही पावडर चपातीच्या पीठात मिक्स करून चपाती बनवा. यामुळे तुमचे वजन कमी होईल.
हे देखील वाचा: केसांसंबंधित सर्वच समस्यांवर शिकेकाई आहे रामबाण उपाय, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत
वजन कमी करण्यासाठी चपातीच्या पीठात मिक्स करा ‘हे’ पदार्थ
मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी मेथी दाणे अत्यंत प्रभावी आहेत. मेथी दाण्यांमध्ये असलेले लोह, फायबर, विटामिन ए, विटामिन डी, अँटिऑक्सिडंट आढळून येतात. मेथी दाण्यांचे सेवन केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी जळून जाते. चपातीच्या पिठात मेथी दाण्यांची पावडर मिक्स करून नंतर चपाती तयार करा. मेथी दाणे घालून बनवलेली चपाती आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यासाठी चपातीच्या पीठात मिक्स करा ‘हे’ पदार्थ
वाढलेले वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचे पाणी प्यायले जाते. पण जर तुम्हाला जिऱ्याचे पाणी प्यायला आवडत नसेल तर तुम्ही चपातीच्या पीठात जिरे टाकू शकता. जिऱ्याची चपाती नियमित खाल्ल्याने तुमचे वाढलेले वजन कमी होईल. जिऱ्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर वजन कमी करण्यासाठी मदत करतात.