केसांच्या मजबूत वाढीसाठी 'अशा' पद्धतीने करा शिकेकाईचा वापरावं
र्वीच्या काळापासून शिकेकाईचा वापर केसांसाठी केला जात आहे. शिकेकाईमध्ये असलेले गुणधर्म केसांच्या चमकदार आणि मजबूत आणि चमकदार वाढीसाठी फायदेशीर आहेत. वातावरणातील बदल, कामाची धावपळ, अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. यामुळे अनेकदा कमी वयात मोठ्या प्रमाणावर केस गळण्यास सुरुवात होते. केस गळती सुरु झाल्यानंतर केसांमध्ये टक्कल पडेल की काय अशी भीती अनेक महिला व्यक्त करतात. पण केसांची निगा राखण्यासाठी आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावणे, शँम्पूचा वापर करून केस स्वच्छ करणे, हेअर मास्क लावणे इत्यादी उपाय केल्याने केस निरोगी राहतात.(फोटो सौजन्य-istock)
केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी केसांना आतून पोषण देणे सुद्धा फार महत्वाचे आहे. तसेच केसांच्या चमकदार वाढीसाठी केमिकल युक्त शॅम्पू वापरण्यापेक्षा शिकेकाईचा वापर करा. शिकेकाईमध्ये विटामिन ए,विटामिन सी,विटामिन के,विटामिन डी आणि अँटी-ऑक्सिडंट्सआढळून येतात. त्यामुळे आयुर्वेदामध्ये केसांच्या चमकदार वाढीसाठी शिकेकाई वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण आपल्यातील अनेकांना शिकेकाईचा वापर नेमका कसा करायचा हेच माहित नाही, चला तर जाऊन घेऊया.
हे देखील वाचा: चेहऱ्यावरील चमक हरवली आहे? तर १ वाटी तांदुळाच्या पाण्याचा ‘असा’ करा वापर,चेहरा दिसेल ग्लोइंग
हे देखील वाचा: चेहऱ्यावर येईल गुलाबी निखार; आजच वापरा ‘हा’ घरगुती प्रोडक्ट
केसांच्या मजबूत वाढीसाठी ‘अशा’ पद्धतीने करा शिकेकाईचा वापरावं