

वजन वाढण्याची कारणे?
चरबीचा घेर कमी करण्यासाठी काय करावे?
आयुर्वेदिक काढा पिण्याचे फायदे?
दिवाळीच्या दिवसांमध्ये घरात फराळ बनवला जातो. फराळातील गोड पदार्थ, पाहुण्यांकडील जेवण आणि खाण्यावरील नियंत्रण सुटल्यामुळे वजन झपाट्याने वाढत जाते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जाते. वजन वाढण्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. लठ्ठपणा वाढल्यानंतर मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा शरीराला इतर अनेक आजारांचा धोका वाढतो. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, चुकीच्या वेळी जेवण, झोपेचा अभाव इत्यादी गोष्टींच्या परिणामामुळे झपाट्याने वजन वाढत जाते. पोट किंवा कंबरेवर चरबीचा घेर वाढू लागल्यानंतर कपडे निवडताना खूप जास्त अडथळे निर्माण करतो.(फोटो सौजन्य – istock)
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी तासनतास व्यायाम, महागडे डाएट, प्रोटीन सप्लिमेंट्स, गोळ्या औषध इत्यादी अनेक गोष्टींचे सेवन केले जाते. पण वारंवार हानिकारक सप्लिमेंट्सचे सेवन केल्यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा अनावश्यक घेर कमी करण्यासाठी आयुर्वेदिक पदार्थांनी बनवलेला काढा प्यावा. हा काढा शरीरासाठी खूप जास्त प्रभावी आहे. यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यासोबतच शरीरातील घाण स्वच्छ होते.
आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम, एक ग्लास पाण्यात जिरं, बडीशेप, धणे घालून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी टोपात तयार केलेले पाणी ओतून गरम करा. पाणी अर्धा झाल्यानंतर पाणी गाळून घ्या. तयार केलेला काढा कोमट झाल्यानंतर सेवन करावे. यामुळे शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. महिनाभर नियमित जिरं आणि बडीशेप घालून बनवलेला काढा प्यायल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यासोबतच शरीर डिटॉक्स होईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. या काढ्यात तुम्ही लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता.
शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी बडीशेप, जिऱ्याचे पाणी खूप जास्त प्रभावी ठरते. त्यामुळे उपाशी किंवा रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही जिऱ्याचा पाण्याचे सेवन करू शकता. अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी आणि ऍसिडिटी नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुर्वेदिक काढा प्यावा. वजन कमी करण्यासाठी केवळ काढाच नाहीतर नियमित व्यायाम, पाण्याचे भरपूर सेवन आणि संतुलित आहार घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.