Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ ड्रायफ्रूटच्या सेवनामुळे होतात अनेक फायदे, डायब‍िटीज करतो कमी, देतो तंदुरुस्त हाडांची हमी

काजू, एक असा ड्रायफ्रुट जो लहानग्यांपासून थोरांपर्यंत सर्वेच मजेने खात असतात. पण काजू फक्त चवीत चांगला नसून आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. चला जाणून घेऊया काजूच्या सेवनांमुळे होणारे फायदे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 02, 2024 | 08:15 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

काजूत अनेक पोषक तत्वे असतात जे आपल्या शरीरासाठी गुणकारी असतात. काजूमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट असते, जे हृदयाचे आरोग्य नीट ठेवते. हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे. एका काजूमध्ये साधारण 5 ग्राम प्रोटीन असते. तसेच यामध्ये व्हिटॅमिन ई, के आणि बी6 पोषकतत्वे असतात जे शरीराला तंदुरुस्त ठेवतात.

व्हिटॅमिन ई पेशींचे नुकसान टाळते आणि व्हिटॅमिन के रक्त गोठण्यास मदत करते. जर तुम्हाला दुखापत झाली असेल आणि त्यातून रक्त निघत असेल तर व्हिटॅमिन केमुळे रक्त जमा होते. तर व्हिटॅमिन B6 मुळे मेंदूचे काम जलद होते आणि शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय, काजूत मॅग्नेशियम, ज‍िंक, लोह आणि सेलेनियम सारखे अनेक पोषक घटक असतात, जे एकूण आरोग्यासाठी आवश्यक असतात. चला जाणून घेऊया काजू खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात.

हृदयाचे आरोग्य सांभाळते

काजूचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम ड्रायफ्रूट आहे. काजूमध्ये आढळणारे मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी आणि एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी ओळखले जातात. यामुळे हृदयाशी संबंधित आजार कमी करण्यास मदत होते.

वजन नियंत्रित करते

काजूत फॅटचे प्रमाण जास्त असूनही ते वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे. काजूमध्ये असलेले हेल्दी फॅट, प्रोटिन्स आणि फायबर दीर्घकाळ आपले पोट भरलेले ठेवतात. त्यामुळे त्याचे सेवन केल्यावर जास्त खाण्याची इच्छा होत नाही. अभ्यासातून असे दिसून आले आहे की आपल्या आहारात काजूचा समावेश केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

हाडं मजबूत करतात

काजू हे मॅग्नेशियमचे एक उत्कृष्ट स्त्रोत आहे, जे हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. हाडे मजबूत ठेवण्यासाठी मॅग्नेशियम कॅल्शियमसोबत काम करते. याव्यतिरिक्त, काजूमध्ये असणारा व्हिटॅमिन के हाडांमधील फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

डायबेटिज कंट्रोल मध्ये राहतो

वास्तविक, काजू चवीला किंचितसा गोड लागतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की काजू रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. काजूमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, याचा अर्थ ते रक्तातील साखर वेगाने वाढू देत नाहीत. मधुमेहाचे रुग्ण काजू नाश्त्यात खाऊ शकतात.

डोळे चांगले व निरोगी ठेवतात

काजूमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसारखे अँटीऑक्सिडंट असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे अँटिऑक्सिडंट्स हानिकारक प्रकाश आणि मोतीबिंदूपासून डोळ्यांचे रक्षण करतात. त्यामुळे रोज काजू खाल्ल्यास तुमची दृष्टी दीर्घायुषी होऊ शकते.

Web Title: What are the benefits of cashew

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2024 | 08:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.