Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्णवेध संस्कार म्हणजे नेमकं काय? लहान मुलांचे कान टोचण्यामागे आहेत वैज्ञानिक कारणं

या कर्णवेध संस्कारांना अध्यात्मिक दृष्ट्या जितकं महत्व आहे तेवढंच त्यामागे वैज्ञानिक कारणं देखील आहे. चला तर मग जाणून घेऊयात हे कर्णवेध संस्कार असतात तरी काय ?

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 09, 2025 | 01:52 PM
कर्णवेध संस्कार म्हणजे नेमकं काय? लहान मुलांचे कान टोचण्यामागे आहेत वैज्ञानिक कारणं
Follow Us
Close
Follow Us:
  • कर्णवेध संस्कार म्हणजे नेमकं काय?
  • लहान मुलांचे कान टोचण्यामागे काय कारणं ?
  • काय सांगतं विज्ञान आणि अध्यात्म ?
हिंदू धर्मात प्रत्येक विधीमागे एक शास्त्र दडलेलं असतं जे मानवी जीवनाच्या निरोगी आणि हिताचं आहे. यातीलच एक रुढी परंपरांचा भाग म्हणजे कर्णवेध संस्कार जो लहान मुलांवर केला जातो. कर्णवेध संस्कार म्हणजे फक्त मुलांचे कान टोचणं एवढंच त्याचा अर्थ आहे का ? तर नाही. या कर्णवेध संस्कारांना अध्यात्मिक दृष्ट्या जितकं महत्व आहे तेवढंच त्यामागे वैज्ञानिक कारणं देखील आहे. चला तर मग जाणून घेऊयात हे कर्णवेध संस्कार असतात तरी काय ?

कर्णवेध संस्कार हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सोहळा मानला जातो. या संस्कारात बाळाच्या किंवा मुलाच्या कानाला छिद्र पाडून त्यात कानातले म्हणजेच स्थानिक भाषेत ज्याला कुंडी किंवा कुंडल घातले जातात. यामागे धार्मिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक अशा तिन्हीचा अर्थ दडलेला आहे. कर्णवेध म्हणजे बाळाच्या किंवा मुलाच्या कानाच्या पाळीला छिद्र पाडणे . हा संस्कार प्रामुख्याने जन्मानंतर काही महिन्यांनी किंवा काही वेळा ३–५ वर्षांच्या आत केला जातो.

कर्णवेध संस्कार का करतात?

धार्मिकदृष्ट्या पाहायचं झालं तर हिंदू धर्मात १६ संस्कारांपैकी एक म्हणून कर्णवेधाचा उल्लेख आढळतो. कुलदेवतेची किंवा इष्टदेवतेची कृपा लाभावी तसंच घरतल्या या तान्ह्या बाळाचं वाईट शक्तीपासून रक्षण व्हावं म्हणून कर्णवेध संस्कार केला जातो. अनेक कुटुंबात हा विधी करताना पूजा आणि हवन केलं जातं.

तुमचं बाळ रागात खेळणी तोडतं का ? मग श्रीगणेशाची ‘ही’ गोष्ट तुमच्या …

आरोग्यविषयक कारणं

कानाच्या पाळीत विशिष्ट एक्युपंक्चर पॉईंट्स असतात. लहान मुलांचे अवयव कोवळे असतात म्हणूनच जर कानाच्या पाळीला छिद्र केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. कानातले असल्याने कर्णाच्या भागात हवेशीरपणा राहतो व काही किरकोळ संसर्ग टाळता येतात. कर्णवेध संस्कार फक्त एक अध्यात्मिक विधी नाही तर त्यामागे वैज्ञानिक कारणं देखील आहेत. या कर्णवेध संस्काराने बाळाच्या मेंदूचा विकास होतो. एकाग्रता वाढते तसंच बाळ लकर बोलायचं देखील शिकतं असं सर्वासाधारण सांगितलं जातं.

कर्णवेध संस्कार करतात तरी कसा ?

बाळाला दोन ते तीन महिने पूर्ण झाल्यानंतर आणि 5 वर्षांच्या आत त्याचे कान टोचले जातात. सोन्याची बारिक तार किंवा चांदीची तार बाळाच्या कानाच्या पाळीला टोचली जाते. त्यांनंतर काही माहिन्याने बाळाला कान डुल देखील घालतात. मात्र कर्णवेध संस्कार करताना पालकांनी एक काळजी नक्की घ्यावी ती म्हणजे बाळाचे ताप, सर्दी, त्वचेचे आजार किंवा इन्फेक्शन असेल तर त्याचे कान काही दिवस टोचू नयेत. बाळाची तब्येत नाजूकअसते त्यामुळे कर्णवेध संस्कार करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

दिवसभरात न चुकता करा ३ लीटर पाण्याचे सेवन! शरीराला होतील अद्भुत फायदे, महिनाभरात दिसून येईल बदल

कर्णवेध केल्यावरची काळजी

  • छिद्राच्या जागी लालसरपणा किंवा सूज दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
  • बाळातचा कान काही दिवस ओला होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • कानातले खूप जड नसावे; हलके आणि बारिक कडा बाळाच्या कानात असावेत.
कान टोचल्यानंतर छिद्र भरायला १–२ आठवडे लागू शकतात. त्यामुळे बाळाची नीट काळजी घ्यावी लागते. मग आहे की आपल्या हिंदू धर्मातील परंपरा खूपच खास. कर्णवेध हा फक्त एक संस्कार नाही तर बाळाच्या निरोगी आयुष्यासाठी केलेला विधी आहे.
💡

Frequently Asked Questions

  • Que: कर्णवेध संस्कार म्हणजे काय?

    Ans: कर्णवेध संस्कार म्हणजे बाळाच्या किंवा मुलाच्या कानाच्या पाळीला छिद्र पाडून त्यात कुंडी, कुंडल किंवा कानातले घालण्याची परंपरागत प्रक्रिया. हा हिंदू धर्मातील १६ संस्कारांपैकी एक आहे.

  • Que: कर्णवेध संस्कार धार्मिकदृष्ट्या का महत्त्वाचा आहे?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार हा संस्कार बाळावर देवाची कृपा राहावी, वाईट शक्तींपासून संरक्षण मिळावे आणि बाळाचे आयुष्य शुभ असावे या उद्देशाने केला जातो. अनेक घरी पूजा–हवनासह हा विधी पार पाडला जातो.

  • Que: कर्णवेध करताना कोणती काळजी घ्यावी?

    Ans: बाळाला ताप, सर्दी, त्वचेचा संसर्ग किंवा इतर त्रास असल्यास कर्णवेध करणे टाळावे. बाळाची प्रतिकारशक्ती कमी असते, म्हणून हा संस्कार करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: What exactly is ear piercing there are scientific reasons behind piercing the ears of children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 01:52 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.