दिवसभरात न चुकता करा ३ लीटर पाण्याचे सेवन! शरीराला होतील अद्भुत फायदे
महिनाभर ३ लीटर पाण्याचे सेवन केल्यास शरीराला होणारे फायदे?
कमी पाण्याचे सेवनामुळे आरोग्याचे होणारे नुकसान?
शरीरासाठी पाणी का आवश्यक आहे?
मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये पाण्याचा सुद्धा समावेश आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पण कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. डिहायड्रेशन, त्वचेसंबंधित समस्या, पचनाच्या समस्या इत्यादी अनेक आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. पाण्याच्या सेवनामुळे केवळ शरीर हायड्रेटचं नाहीतर त्वचा, केस आणि संपूर्ण शरीराला भरमसाट फायदे होतात. बऱ्याचदा जेवल्यानंतर किंवा कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर पाण्याचे सेवन केले जात नाही. असे केल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होत नाहीत आणि आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी रिकाम्या पोटी प्यावे. आज आम्ही तुम्हाला महिनाभर नियमित ३ लीटर पाण्याचे न चुकता सेवन केल्यास शरीराला नेमके काय फायदे होतील, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
Pregnant Woman: नववर्ष साजरे करताना गर्भवती महिलांनी पाळाव्यात ‘या’ महत्त्वाच्या टिप्स
पाणी शरीर हायड्रेट ठेवण्यासोबतच खाल्लेले अन्नपदार्थ पचन करण्यासाठी सुद्धा मदत करते. वारंवार पाण्याचे सेवन केल्यामुळे सतत लघवीला जावे. कारण किडनीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. पाण्याच्या सेवनामुळे शरीरात जमा झालेले जास्तीचे मीठ सुद्धा कमी होईल. यामुळे शरीराच्या आतील अवयवांना आलेली सूज आणि ब्लोटिंगची कमी होण्यास मदत होईल. शरीराच्या आतील अवयव स्वच्छ होण्यास मदत होईल.
नियमित ३ लीटर पाण्याचे सेवन केल्यास त्वचेमध्ये स्पष्ट फरक दिसून येतील. पाण्याच्या सेवनामुळे त्वचेच्या पेशी हायड्रेट होण्यास मदत होईल. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल. त्वचेवर कायमच चमकदार आणि तेजस्वी ग्लो आणण्यासाठी पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि चेहऱ्यावर पिंपल्स येणार नाहीत.
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. मोठ्या आतड्यांमधील घाण सहज बाहेर पडून गेल्यास बद्धकोष्ठता कमी होण्यासोबतच पचनक्रिया सुधरण्यास मदत होईल, गॅस, अपचनाच्या समस्येपासून आराम मिळेल. वारंवार खाण्याची इच्छा कमी करण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे.
सतत ३ लिटर पाण्याचे सेवन केल्यानंतर महिनाभरात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारण्यास मदत होईल. पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, मेंदूपर्यंत अधिक ऑक्सिजन पोहोचतो, मानसिक स्पष्टता वाढते. शरीरातील प्रत्येक स्नायूंपर्यंत पाणी पोहोचल्यास मसल पेन किंवा हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होतात. पाण्यामध्ये असलेले पोषक घटक केस आणि नखांची वाढ करतात. याशिवाय शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब कायमच नियंत्रणात राहतो. हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पाण्याचे सेवन करावे.
Ans: वजन, उंची आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते, पण साधारणपणे दररोज २ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
Ans: शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
Ans: जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे, कारण यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो.






