इलूमिनाटीशी जोडलेल्या काही खास गोष्टी. (फोटो सौजन्य - Social Media)
इलूमिनाटी या संघटनेची स्थापना बव्हेरिया या देशात झाली. इंगोल्स्टेड विश्वविद्यालयात सुरुवात करण्यात आली होती. १ मे, १७७६ रोजी या संघटनेची स्थापना करण्यात आली.
या संघटनेची स्थापना बव्हेरियाचे प्रसिद्ध वकील वेईशोप आणि बेटंन ओस्को यांनी केली होती. परंतु, १७८५ मध्ये या संघटनेला अवैध गोष्टीत करण्यात आले.
इलूमिनाटीने स्त्रियांच्या शिक्षणाला आणि लैगिक समानतेला नेहमीच पाठिंबा दिला. प्रॉव्हिडन्सच्या डोळ्याला इलूमिनाटी या संघटनेचा प्रतीक म्हणून पाहिला जातो.
इलूमिनाटीच्या बाबतीत इतर काही संघटनांनी या संघटनेचा नाव वापरून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
मुळात, काही लोकांचे म्हणणे आहे कि इलूमिनाटी ही एक अशी संघटना आहे जी जगात घडणाऱ्या घडामोडींमागे मोठा प्रभाव टाकते.