पोर्नोग्राफी हा विषय सर्वसामान्यांपासून लपवण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी आजच्या डिजिटल युगात विशेषतः तरुणांमध्ये हा विषय अत्यंत प्रचलित आहे. जागतिक अहवालानुसार ११ ते १६ वयोगटातील सुमारे ५३% मुले पोर्नच्या प्रभावाखाली असून भारतातीत तरूणही या ट्रेंडपासून दूर नाहीत.आता या जगात अजून एका अति धोकादायक प्रकाराची भर पडली आहे – लाईव्ह पोर्नोग्राफी.
लाईव्ह पोर्नोग्राफी ही केवळ एक मनोरंजनाची साधन नसून, एक गंभीर सामाजिक संकट बनली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतासह जगभरातील तरुण पिढी या पॉर्नोग्राफीची शिकार बनत चालली आहे. समाजातील असंवेदनशीलता, डिजिटल अनैतिकता आणि कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी यामुळे हे संकट अधिकच गडद होत आहे.
हे अश्लीलतेचे एक असे रूप आहे जे पूर्वनिर्मित नसून प्रत्यक्ष वेळी-वेळी इंटरनेटवर “थेट” प्रसारित केले जाते. यामध्ये अनेक वेळा जबरदस्ती, मानव तस्करी, बाल शोषण किंवा गैरसोयीच्या परिस्थितीत असलेल्या व्यक्तींचा वापर होतो. हे सत्र बहुतेक वेळा ‘वेबकॅम मॉडेलिंग’च्या नावाखाली चालवले जातात.
वेबकॅम प्लॅटफॉर्म्स: अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर पैसे भरून ‘लाईव्ह’ कार्यक्रम पाहता येतात.
डार्क वेबद्वारे व्यवहार: काही गुन्हेगारी गट हे थेट डार्क वेबवरून ऑपरेट करतात.
बाल शोषण: काही देशांमध्ये अल्पवयीन मुलांचा यामध्ये सहभाग हे अधिक धक्कादायक वास्तव आहे.
मानव तस्करीचा धोका: गरिबी व अज्ञानाचा गैरफायदा घेत अनेक मुलींना या दलदलीत ढकलले जाते.
जगातील काही देश – विशेषतः फिलिपाइन्स, रोमानिया, रशिया, आणि थायलंड – यांना या लाईव्ह पोर्नोग्राफीच्या ‘हब’ म्हणून ओळखले जाते. तंत्रज्ञान, गरिबी, कायद्यांची शिथिल अंमलबजावणी आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरील नियंत्रणाचा अभाव यामुळे ही समस्या वाढत चालली आहे.
२०१८ मध्ये भारत सरकारने हजारो पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घातली होती. मात्र, ही बंदी दीर्घकाळ टिकू शकली नाही.
नात्याला झाली अनेक वर्ष, पण गायब झालाय रोमान्स; त्वरीत करा 5 काम
IT Act 2000 – कलम 67A
अश्लील व्हिडीओ/कन्टेंट तयार करणं, पसरवणं किंवा शेअर करणं
शिक्षा: 5 वर्षे तुरुंग आणि ₹10 लाख दंड
IPC कलम 292 आणि 293
अश्लील साहित्याची विक्री, वितरण किंवा जाहिरात
पहिल्या गुन्ह्यासाठी 2 वर्षे तुरुंग, पुढील गुन्ह्यासाठी 5 वर्षांपर्यंत शिक्षा
बाल पोर्नोग्राफी
हे एक गंभीर गुन्हा आहे. POCSO कायदा अंतर्गत कडक शिक्षा होऊ शकते.
(टीप- “पॉर्नोग्राफी हा फक्त वैयक्तिक प्रश्न नाही, तर तो समाज, कुटुंब आणि आपल्या मानसिकतेवर परिणाम करणारा विषय आहे. त्यामुळे पोर्नोग्राफीचे व्यसन लावून घेऊ नका, असे आवाहन नवराष्ट्र टीमकडून केले जात आहे”)