गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी स्वीट कॉर्न सूप
पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर बाजारात गेल्यानंतर हातगाडीवर सगळ्यांना भाजलेले मक्याचे कणीस पाहायला मिळत असतील. भाजलेले मक्याचे दाणे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अतिशय आवडीने खाल्ले जातात. कोळश्यावर भाजलेले मक्याचे कणीस आणि त्यावर लावलेले लिंबू आणि मीठ चवीला अतिशय सुंदर लागते. मक्याचे दाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण यामध्ये विटामिन ए, बी, ई, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. तसेच मक्याच्या दाण्यांमध्ये असलेले असलेले विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स हे इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी मदत करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हेल्दी टेस्टी स्वीट कॉर्न सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मक्याचे दाण्यांचे सूप तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर पिऊ शकता. पोषक घटकांनी समृद्ध असलेले मक्याचे दाण्यांचे सूप चवीला सुद्धा चांगले लागते. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
बाहेरचं कशाला घरीच बनवा टेस्टी आणि सर्वांच्या आवडीचा Chicken Pizza; नाइट क्रेव्हिंग्ससाठी परफेक्ट
कृती:
मक्याच्या दाण्यांचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅन मध्ये बटर गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेलं आलं आणि लसूण घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून लाल सोनेरी होईपर्यंत व्यवस्थित भाजा. त्यानंतर त्यात चिरलेली गाजर, सिमला मिरची आणि फ्रेंच बीन्स घालून शिजवून घ्या.
भाज्या हलक्या शिजल्यानंतर त्यात मक्याचे दाणे आणि बारीक क्रश केलेले मक्याचे टाकून वरून कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालून शिजवून घ्या.
नंतर त्यात शिजवलेल्या भाज्यांचे पाणी घालून व्यवस्थित उकळी काढून घ्या. सूपला एक उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पावडर घालून मिक्स करा.
सूप शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी वरून कांद्याची हिरवी पात घालून मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मक्याच्या दाण्यांचे सूप.