फोटो सौजन्य - Social Media
ऑइल मसाज हिवाळ्यात विशेषत: फायदेशीर असतो. हिवाळ्यामध्ये शरीराला उबेची गरज असते. या वातावरणामध्ये तिळाच्या तेलाने शरीराला उब मिळते. या गोष्टी आयुर्वेदानेही मान्य केल्या आहेत. आज या लेखामध्ये आपण ऑइल मसाज करण्यासह फायदे काय? ऑइल मसाज करण्याची योग्य पद्धत काय? आणि योग्य वेळ कोणती? तिळाच्या तेलाने मसाज केल्याने मांसपेशी आणि हाडे मजबूत होतात. भारतात ऑइल मसाज करण्याची एक जुनी परंपरा आहे. पण अनेक लोक विचारतात, ऑइल मसाज कधी करावा? अंघोळ करण्याआधी कि अंघोळ करण्याच्या नंतर? चला तर मग जाणून घेऊयात.
आयुर्वेदानुसार, ऑइल मसाज करण्याची योग्य वेळ अंघोळी आधी आहे. अंघोळ करण्याच्या आधी ऑइल लावल्यामुळे शरीर उबदार होते, त्यामुळे हिवाळ्यात अंघोळ करताना थंडी लागत नाही. ऑइल मसाज केल्यानंतर लगेच अंघोळ करणे टाळा. काही अंतर ठेवा. हिवाळ्यात ऑइल मसाज केल्यामुळे त्वचा शुष्क आणि थंड हवेमुळे होणारे नुकसान टाळता येते आणि रक्ताभिसरण सुधरते.
हिवाळ्यात मसाजसाठी उत्तम ऑइल कोणते?
तेल मसाज शरीराच्या आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. नियमित तेल मसाज केल्याने वृद्धत्वाचे लक्षण कमी होतात आणि त्वचा अधिक तरतरीत दिसते. सांध्यांच्या लवचिकतेत सुधारणा होते, ज्यामुळे दुरुस्ती करण्याची प्रक्रिया जलद होते. शरीराच्या ताणामुळे होणारा परिणाम कमी होतो, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होतो. तेल मसाज आपल्याला शांत आणि आरामदायक झोप मिळविण्यात मदत करतो, ज्यामुळे सकाळी ताजेतवाने आणि उर्जेने भरलेले अनुभव मिळतात. हिवाळ्यात खासकरून त्वचा आणि शरीराच्या समग्र आरोग्यासाठी तेल मसाज खूप फायदेशीर ठरतो.