
जागतिक शौचालय दिवसाचा इतिहास
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडून जाणे गरजेचे आहे. पण पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडून गेले नाहीतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक महत्वाची गरज म्हणजे शौचालय. त्यामुळे जगभरात सगळीकडे जागतिक शौचालय दिवस साजरा केला जातो. या दिवशी आजारांपासून बचाव करण्यासाठी आणि स्वच्छतेच्या नियमांना प्रोत्साहन दिले जाते. उघड्यावर शौचास प्रतिबंध करण्यासारख्या विशेष मुद्यांवर भर द्याचे काम या दिवशी केले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जगभरात जागतिक शौचालय दिवस का साजरा केला जातो? यंदाची थीम आणि जागतिक शौचालय दिवसाचा इतिहास, याबद्दल विशेष माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
2001 मध्ये सिंगापूरमध्ये जॅक सिम यांनी जागतिक शौचालय दिवसाची सुरुवात केली होती. त्यानंतर 19 नोव्हेंबर पासून जगभरात सगळीकडे जागतिक शौचालय दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. स्वयंसेवी संस्थांनी शौचालयाचे महत्त्व अधोरेखित करण्याचे उद्दिष्ट ठेवत 2007 मध्ये हा साजरा करण्यास सुरुवात झाली. तसेच हा दिवस साजरा करण्यासाठी शाश्वत स्वच्छता आघाडीकडून पाठिंबा देण्यात अलका होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने पाण्याचा आणि स्वच्छतेचा हक्क हा मूलभूत मानवी हक्क म्हणून स्वीकारला आणि 2010 मध्ये जागतिक शौचालय दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली.
शौचालय – शांततेचे ठिकाण, अशी जागतिक शौचालय दिवसाची 2024 ची थीम ठरवण्यात आली आहे. सतत बदलत चालेले हवामान, नैसर्गिक आपत्तीमुळे सगळीकडे स्वच्छतेचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच 2030 पर्यंत सर्वांसाठी सुरक्षित शौचालये आणि शाश्वत विकासाची 6 उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
जगभरात सगळीकडे जागतिक शौचालय दिवस 19 नोव्हेंबरला साजरा केला जातो. वाढती अस्वच्छता, हवामान बदल, आपत्ती आणि दुर्लक्ष इत्यादी अनेक कारणांमुळे सगळीकडे स्वच्छतेचा अभाव निर्माण झाला आहे. सगळीकडे अस्वच्छता निर्माण झाल्यामुळे मानवी जीवन धोक्यात आले. कचरा, घाणीमुळे अनेक गंभीर आजार पसरू लागतात. अपुरी शौचालय व्यवस्था, खराब तुटलेले शौचालय इत्यादी गोष्टींमुळे घाण वातावरणात पसरते आणि अनेक गंभीर आजार पसरतात. त्यामुळे जगभरातील प्रत्येक व्यक्तीकडे शौचालय असावे, यासाठी जागतिक शौचालय दिवस साजरा केला जातो.