शरीराचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी यकृत महत्वपूर्ण भूमिका बजावते. पण जर यकृताचे आरोग्य बिघडले तर लिव्हर सिरोसिस, हेपेटायटीस किंवा फॅटी लिव्हर इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात पोषक घटकांचे सेवन करावे. यकृताचे आरोग्य बिघडल्यानंतर शरीरावर नकारात्मक परिणाम दिसून येतात. तसेच विषारी पदार्थ बाहेर पडून गेले नाहीतर पूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला यकृतामधील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या वनस्पतींचे सेवन करावे, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
औषधी वनस्पतींचे फायदे

कडुलिंबाच्या पानांचा रस प्यायल्यामुळे यकृतामधील विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होईल. यकृत स्वच्छ होऊन आराम मिळेल.

त्रिफळा ही औषधी वनस्पती असून आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. त्रिफळाच्या पावडरचे किंवा त्रिफळा पाण्यात टाकून प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील.

पिवळ्या रंगाची रानटी फुल झाड यकृताचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतात. डँडेलियन रूट चहाच्या स्वरूपात तुम्ही या फुलाचे सेवन करू शकता.

तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे यकृताचे आरोग्य निरोगी राहते. यकृतामधील विषारी घटक काढून टाकण्यासाठी तुळशीच्या पानांचे सेवन करावे.

आल्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तुम्ही आल्याचे पाणी किंवा आल्याचा रस काढून सुद्धा पिऊ शकता.






