Breadcrumbing
नात्याची सुरुवात हा काही लोकांसाठी चांगला अनुभव असतो, तर काहींसाठी तो आयुष्यभराचा त्रास असतो. ऑनलाइन डेटिंगच्या ट्रेंडने नातेसंबंध अधिक सोपे केले आहेत, त्याचवेळी अनेक लोक याद्वारे समोरच्या व्यक्तीच्या भावनांशी खेळू लागतात.
नातेसंबंधांच्या या आधुनिक युगात, जर तुम्ही सावधगिरी बाळगली नाही तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता आणि ब्रेडक्रंबिंगचे बळी होऊ शकता. त्यामुळे हा ट्रेंड काय आहे ते जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
काय आहे ब्रेडक्रंबिंग
“ब्रेडक्रंबिंग” मध्ये व्यक्ती नातेसंबंधात कोणत्याही प्रकारची वचनबद्धता टाळते. तुमच्याशी फ्लर्ट करून तुम्हाला गुंतवून ठेवते पण तुमच्यामध्ये समोरची व्यक्ती अजिबात गुंतत नाही. यामध्ये ब्रेडक्रम्ब्सचे कोणतेही नुकसान नाही, परंतु त्याचा परिणाम समोरच्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. तथापि, असे काही संकेत आहेत ज्याद्वारे तुम्ही अशा व्यक्तीला ओळखू शकता आणि त्याचा गैरवापर होण्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकता.
[read_also content=”पतीसोबत कडाक्याचं भांडण झालं तर असेल तर.. https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-have-a-bitter-quarrel-with-your-husband-do-not-do-such-things-at-all-it-will-lead-to-disputes-nrsk-535811.html”]
सोयीनुसार येणेजाणे
ब्रेडक्रंब्स तुमच्या सोयीनुसार किंवा इच्छेनुसार अजिबात चालत नाहीत. लोकांना गोंधळात टाकणे ही त्यांची खासियत आहे. अनेकवेळा ते अचानक गायब होतात आणि जेव्हा त्यांना तुमची गरज भासते तेव्हा ते कुठल्यातरी बहाण्याने परत येतात. ते अनेक दिवस तुमच्या मेसेजना उत्तर देत नाहीत, परंतु जेव्हा तुम्ही तसे करण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते तुम्हाला विविध मार्गांनी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू शकतात.
गरज असेल तेव्हा
हे ब्रेडक्रंबचे एक मोठे चिन्ह आहे. ते त्यांच्या सोयीनुसार तुमच्याशी संपर्क साधतात. जेव्हा ते कंटाळलेले असतात किंवा त्यांच्यासोबत हँग आउट करण्यासाठी किंवा चॅट करण्यासाठी कोणीही सापडत नाही, तेव्हा ते तुमची आठवण ठेवतील. या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची चूक तुम्ही अजिबात करू नका. प्रेमाच्या नावाखाली आंधळेपणाने विश्वास ठेऊ नका.
[read_also content=”प्रेमविवाह असूनही का तुटते नाते https://www.navarashtra.com/lifestyle/experts-of-religious-texts-say-that-due-to-this-mistake-the-relationship-of-people-who-marry-for-love-breaks-535621.html”]
भविष्याशी काहीही संबंध नाही
असे लोक तुमच्याशी गंभीर विषयांवर चर्चा करण्याचे टाळतात. जेव्हा तुम्ही त्याच्याशी नातेसंबंधाच्या भविष्याबद्दल बोलता तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरं देतात. इतकेच काय, अशा गंभीर गोष्टींमुळे ते चिडतात आणि तुमच्यावर वेगवेगळे आरोपही करतात. गोष्टींना मुरड घालून विषय बदलण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी वेळीच सावध व्हा.
भेटणे टाळतात
ब्रेडक्रंबर्स तुमच्याशी अप्रत्यक्षपणे खूप बोलतील, पण जेव्हा जेव्हा समोरासमोर भेटण्याचा प्रसंग येतो तेव्हा ते टाळतात. जरी ते तुम्हाला एकदा भेटले तरी ते तुम्हाला दुसऱ्यांदा भेटणे टाळण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला आशा लाऊन ठेवतात. याचा अर्थ, एक प्रकारे ते तुम्हाला गोंधळात टाकतात.