व्हजायनल इरिटेशन म्हणजे काय
योनिमार्गाची जळजळ, ज्याला योनिमार्गदाह असेही म्हणतात अथवा इंग्रजीत ज्याला vaginitis असे म्हटले जाते. हा एक प्रकारचा योनीमार्गाचा संसर्ग आहे, ज्यामध्ये महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. UTI सारख्या सामान्य संसर्गाबद्दल सर्वांना माहिती असली तरी, बहुतेक स्त्रियांना vaginitis बद्दल माहिती नाहीये आणि या आजारामुले परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
डॉ. आस्था दयाल, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, सीके बिर्ला हॉस्पिटल, गुरुग्राम यांनी vaginitis ची काही कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय समजून सांगितले आहे. प्रत्येक महिलेला आपल्या शरीराबाबत हे जाणून घेण्याची गरज आहे. याबाबत कोणतीही लाज बाळगणे हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock)
व्हजायनल इरिटेशन म्हणजे काय?
vaginitis हा नेमका काय त्रास आहे
योनिमार्गाची जळजळ, ज्याला योनिशोथ असेदेखील म्हणतात. ही एक दाहक स्थिती आहे ज्यामुळे अस्वस्थता होते, योनीतून स्त्राव येतो आणि खाज सुटते. तज्ज्ञांच्या मते, संसर्ग, हार्मोनल बदल आणि अॅलर्जींसह अनेक परिस्थितींमुळे हे होऊ शकते. योनिमार्गाच्या लक्षणांवर योग्य उपचार करण्यासाठी व्हजायनल इरिटेशनची कारणे आणि उपचार समजून घेणे महत्त्वाचे आहे.
हेदेखील वाचा – शारीरिक संबंध न ठेवता किती काळ जिवंत राहू शकता? काय सांगता तज्ज्ञ?
व्हजायनिटसचे कारण
व्हजायनल इरिटेशनचे कारण काय आहे
डॉ. आस्था दयाल यांच्या मते, “व्हजायनल इरिटेशन हे अनेक कारणांमुळे होऊ शकते, ज्यात संसर्ग, हार्मोनल बदल, चिडचिड आणि इतर परिस्थितींचा समावेश आहे.” संसर्ग हे त्यापैकी एक प्रचलित कारण आहे जसे की:
“हार्मोनल बदल, विशेषत: रजोनिवृत्तीनंतर, एट्रोफिक योनिनायटिस होऊ शकते, जे इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यावर उद्भवते. या स्थितीत योनीच्या भिंती कमकुवत आणि कोरड्या होतात. साबण, डिटर्जंट्स आणि शुक्राणूनाशके, चिडचिड करणारे रसायने, तसेच लेटेक कंडोम किंवा वैयक्तिक स्वच्छता उत्पादनांची अॅलर्जी या सर्वांमुळे योनिमार्गाचा दाह होऊ शकतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी या कारणांकडे विशेष लक्ष द्या” असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
कसा करावा उपाय
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आस्था दयाल यांच्या मते, “योनीतून होणारी जळजळ याच्या मूळ कारणावर उपचार केला जातो. मेट्रोनिडाझोल किंवा क्लिंडामायसीन सारखी औषधे तोंडी खाण्यासाठी किंवा जेल किंवा लोशन म्हणून दिली जातात, सामान्यतः जिवाणू योनीसिसवर उपचार करण्यासाठी वापरली जातात. तर ओरल फ्लुकोनाझोल, टॉपिकल मायकोनाझोल किंवा क्लोट्रिमाझोल यांसारखी बुरशीविरोधी औषधे यीस्ट संसर्गावर उपचार करतात. ट्रायकोमोनियासिसवर उपचार करण्यासाठी अँटीपॅरासिटिक औषधे, प्रामुख्याने मेट्रोनिडाझोल किंवा टिनिडाझोल दिली पाहिजेत.” असे त्यांनी स्पष्ट केले.
चिडचिड किंवा अॅलर्जीक व्हजायनल इरिटेशनचा उपचार करण्यासाठी, लक्षणे कारणीभूत असणारे चिडचिडे ओळखणे आणि टाळणे आवश्यक आहे. जळजळ कमी करण्यासाठी टॉपिकल स्टिरॉइड्सचा वापर केला जाऊ शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेदेखील वाचा – सकाळीच शारीरिक संबंध ठेवाल तर मिळतील कमालीचे फायदे, रिसर्चमध्ये खुलासा
टाळण्यासाठी काय करावे
व्हजायनल इरिटेशन टाळण्यासाठी काय करावे
चिडचिड टाळाः सुगंधित टॅम्पन्स, पॅड आणि साबण पूर्णपणे टाळा. आंघोळ केल्यावर, व्हजायनाच्या आजूबाजूचा भाग स्वच्छ करा आणि चिडचिड टाळण्यासाठी क्षेत्र पूर्णपणे कोरडे करा. सौम्य साबण वापरा आणि दुर्गंधीनाशक किंवा बबल बाथ टाळा.
वॉशरूमचे नियम लक्षात ठेवाः टॉयलेट वापरल्यानंतर व्हजायना पुढून मागे पुसून टाका. असे केल्याने तुमच्या योनीमध्ये फेकल बॅक्टेरिया पसरण्यापासून प्रतिबंध होतो. याशिवाय, लघवी केल्यानंतर, योनी पाण्याने धुवा आणि टिश्यूने कोरडी करा.
सुरक्षित संभोग कराः नेहमी सुरक्षित शारीरिक संबंध ठेवा आणि यावेळी कंडोम वापरणे आवश्यक आहे. त्याच वेळी, लैंगिक भागीदारांची संख्या मर्यादित करा, यामुळे संसर्गाचा धोका टाळता येतो.
कॉटन अंडरवेअर घालाः हलके कॉटन अंडरवेअर घाला. यामुळे हवा आत जाऊ शकते आणि सर्व प्रकारच्या संसर्गाचा धोका कमी होतो. रात्री झोपताना अंडरवेअर घालू नका कारण जीवाणू ओलसर वातावरणात वाढतात.
योनी तपासाः आरशात तुमची योनी पहा आणि तुमच्या नियमित गंध आणि योनीतून येणाऱ्या स्त्रावकडे लक्ष द्या. मासिक पाळी दरम्यान डिस्चार्जमध्ये थोडासा बदल होणे सामान्य आहे. परंतु काहीतरी चुकीचे आहे की नाही हे सांगण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचे शरीर चांगले जाणून घेणे, त्यामुळे आवश्यक असल्यास लवकरात लवकर उपचार मिळू शकतात.