सकाळी शारीरिक संंबंध ठेवल्यास काय होते
बहुतेक जोडप्यांमध्ये शारीरिक संबंध म्हणजे रात्रीची क्रिया मानतात. मात्र दिवसभर धावपळ केल्यावर शरीरामध्ये थकवा आणि कमी उर्जा असते. यामुळे रात्रीच्या वेळी शारीरिक संबंध अधिक आनंददायी बनवणे सोपे नसते.
अशा परिस्थितीत उत्साह आणि उर्जेने भरलेल्या सकाळचा शारीरिक संबंध हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे शरीरात आनंदी हार्मोन्स तर सोडली जातातच पण इम्युनिटी बूस्टरही विकसित होते. सकाळच्या वेळी शारीरिक संबंध ठेवण्याचे इतर आरोग्य फायदे जाणून घ्या. अनेक अभ्यासातून याबाबत माहिती देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या शारीरिक संबंधाचे फायदे
का ठेवावे सकाळी शारीरिक संबंध
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, सकाळच्या वेळी शारीरिक संबंधादरम्यान शरीरात फील-गुड हार्मोन्स सोडले जातात. यामुळे शरीरात एंडोर्फिनचे उत्पादन वाढते. ज्यामुळे चिंता आणि नैराश्यापासून आराम मिळतो आणि स्मरणशक्तीही सुधारते. वारंवार जर शारीरिक संबंध ठेवले तर त्याचे फायदे म्हणजे आठवड्यातून 2 ते 3 वेळा शारीरिक संबंध केल्याने कॅलरी बर्न होण्यास मदत होते.
काय सांगतात तज्ज्ञ
तज्ज्ञांनी केला महत्त्वाचा खुलासा
याबाबत मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या कन्सल्टंट गायनॅकॉलॉजिस्ट डॉ सुदेष्णा राय सांगतात की, सकाळच्या प्रहरी जोडप्याने शारीरिक संबंध ठेवल्यास शरीरातून आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. यामुळे केवळ मानसिक आरोग्याचा फायदा होत नाही तर इम्युनोग्लोबिन पेशींचे प्रमाणही वाढते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढू लागते. तसंच नैराश्य आणि चिंता टाळता येते.
मूड बुस्ट करण्यासाठी
सकाळच्या वेळी शारीरिक संबंधामुळे शरीरात डोपामाइन, एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन सारख्या आनंदी हार्मोन्सचे उत्सर्जन वाढते. यामुळे शरीरातील तणावाची पातळी कमी होण्यास मदत होते आणि शरीर रिलॅक्स राहते. यामुळे कामोत्तेजनापर्यंत पोहोचणे सोपे होते. आनंद तणाव कमी करण्यास आणि मानसिक आरोग्यास चालना देण्यास मदत करते आणि मूड चांगला राहतो
झोपेची गुणवत्ता वाढते
झोपेचा दर्जा सुधारण्यास मदत
शारीरिक संबंधामुळे झोप न येण्याची समस्या दूर होऊ शकते. नियमित जर सकाळी शारीरिक संबंध ठेवले तर डोकेदुखी, थकवा आणि निद्रानाश ही लक्षणे कमी होऊ शकतात. यामुळे शरीर उत्पादक आणि सक्रिय राहते. यामुळे झोपेची गुणवत्ता वाढते, ज्यामुळे मानसिक आरोग्यालाही फायदा होतो.
प्रतिकारशक्ती वाढते
सायन्स डायरेक्टच्या संशोधनानुसार, सकाळच्या शारीरिक संबंधांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे शरीरात बॅक्टेरियाचा संसर्ग, विषाणू आणि इतर प्रकारच्या संसर्गाचा धोका कमी होतो. आठवड्यातून 2 ते 3 वेळा शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरात इम्यून फायटिंग अँटीबॉडीज बाहेर पडतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढू लागते.
हेदेखील वाचा – वयानुसार दर महिन्यात किती वेळा ठेवावे शारीरिक संबंध? धक्कादायक आकडे अहवालातून समोर
अँटीएजिंग गुणांनी युक्त
इतरही अनेक फायदे मिळतात
मिशिगन युनिव्हर्सिटीच्या 2009 च्या रिपोर्टनुसार, शारीरिक संबंधांमुळे शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढू लागते. यामुळे त्वचेतील कोलेजन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्वचेतील कोलेजनचे योग्य प्रमाण त्वचेची जाडी वाढवते, ज्यामुळे सुरकुत्यापासून आराम मिळतो. तसंच शरीरात रक्त प्रवाह वाढतो, ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी योग्य राहते
बाँडिंग वाढण्यास मदत
रात्रीच्या शारीरिक संबंधांपेक्षा तुम्ही सकाळच्या शारीरिक संबंधांचा जास्त आनंद घेऊ शकता. वास्तविक, कोणत्याही थकव्याशिवाय या प्रक्रियेमुळे अधिक आनंद घेता येतो. यामुळे जोडीदाराला समाधान वाटते, ज्यामुळे दोन व्यक्तींमधील बंध वाढण्यास मदत होते. याशिवाय एकमेकांना समजून घेण्यास आणि बोलण्यासाठी जास्त वेळ मिळतो
हेदेखील वाचा – गर्भधारणा झाल्यास शारीरिक संबंध का ठेवू नये? नक्की वाचा…
अर्ली मॉर्निंग वर्कआऊट
सकाळीच लवकर वर्कआऊटदेखील होते
हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अहवालानुसार, शारीरिक संबंधांमुळे दर मिनिटाला 5 कॅलरीज बर्न होतात. अशा स्थितीत सकाळच्या शारीरिक संबंधांमुळे शरीर सक्रिय आणि तंदुरुस्त राहण्यास मदत मिळते. शारीरिक संबंधाला आरोग्यदायी व्यायाम म्हणतात. त्यामुळे शरीरात ऊर्जा वाढू लागते, ज्यामुळे कामाची उत्पादकताही वाढते
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.