फोटो सौजन्य - Social Media
नियमित अंघोळ करणे शरीराच्या आरोग्यसाठी जसे फायद्याचे असते, तसेच दातांची स्वछता असणेही फार महत्वाची आहे. आपल्या शरीरामध्ये आपण कितीही निरोगी अन्न टाकण्याचा प्रयत्न केला तरीही जर आपले दात स्वच्छ नसतील तर याचा काहीच उपयोग होणार नाही. आपल्या शरीराचे संपूर्ण आरोग्य आणखीन ढासळेल. कारण दात साफ नाही करणे म्हणजे दातावर जमलेल्या जंतूंना त्यांचे कुटुंब वाढवण्यात मदत करणे. त्यांना निवारा देणे, त्यांना अन्न पाण्याची सगळी सुविधा करणे. परंतु, या दिलदारीपणात स्वतःच्या आरोग्याची वाट लावली जाते.
हे देखील वाचा : परफेक्ट ऑफबीट बीच व्हेकेशनसाठी भारतातील ‘या’ 5 ठिकाणांना नक्की भेट द्या; प्रवास होईल रोमांचकारी
जर कुणाला दात घासण्यात कंटाळा येत असेल, तर त्या कंटाळ्याला शेवटचा राम राम करा. आणि पुन्हा या वाटेवर येण्यास सक्ती करा, नाहीतर दातांवर या जंतूंना निवारा देत अनेकां आजारांना शरीर बळी जाईल. जर अनेक कालांतरापासून दात घासले नसतील तर शरीर अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. हिरड्यांना झालेल्या त्रासामुळे काही टॉक्सिन बाहेर पडतात. रक्ताच्या प्रवाहामध्ये मिक्स होऊन ते ह्रदयाकडे पोहचतात. यामुळे स्ट्रोक येण्याची शक्यता असते. तसेच दातांची स्वछता न केल्याने हिरड्यांना सूज येते.
या सुजेचा परिणाम शरीरातील इन्सुलिन तसेच साखरेच्या पातळीवर जाणवते. परिणामी, शरीराला मधुमेहाची लागण होते. या प्राणघातक आजारांपासून स्वतःला लांब ठेवण्यासाठी दररोज नियमितपणे दात घासणे महत्वाचे आहे. गरोदर महिलांनी दातांची विशेष स्वछता घेतली पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये दातांची साफसफाई करणे फार महत्वाचे असते. दातांची स्वछता न राखल्यास होणाऱ्या बाळाची प्रकृतीमध्ये काही कमतरता निघते तसेच बाळाचे वजन फार कमी असते.
हे देखील वाचा : Parenting Tips: मुलीला ‘प्रिन्सेस ट्रिटमेंट’च नाही तर 5 पद्धतीने द्या आत्मविश्वास
महिनाभर ब्रश केला नाही तर स्पिरेटरी इन्फेक्शनचा धोका वाढतो. दातांमध्ये तसेच संपूर्ण तोंडामध्ये बॅक्त्रेयीया आणि जीव जंतू वाढत जातात. परिणामी, स्पिरेटरी इन्फेक्शन सारखा आजार शरीराला होतो. दात न घासल्याने तोंडामध्ये दुर्गंध तयार होते. याचा स्वतःलाही त्रास होतो तसेच आपल्या शेजारी असलेल्या माणसालाही त्रास होतो. ज्यामुळे संबंध बिघडतात. लव्ह लाईफमध्ये अडचणी येण्याच्या समस्या असतात. दाते कमजोर होत जातात आणि हिरड्यांची सुजन आणि त्यापासून होणाऱ्या वेदना वाढत जातात.