
फोटो सौजन्य - Social Media
आजच्या काळात पंखा ही प्रत्येक घरातील अत्यावश्यक वस्तू आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, (History of fan) या साध्या वाटणाऱ्या उपकरणामागेही एक रोचक इतिहास दडलेला आहे? सुरुवातीच्या काळात पंखा हा हाताने चालवला जाणारा (हातपंखा) होता. भारत, चीन आणि इजिप्तसारख्या प्राचीन संस्कृतींमध्ये उष्णतेपासून बचाव करण्यासाठी हातपंखे वापरले जात. भारतीय राजदरबारांमध्ये सेवक हातपंख्याने राजा-महाराजांना हवा घालायचे, त्यालाच ‘पंखा’ हे नाव पडले.
विद्युत पंख्याचा शोध
आधुनिक पंख्याचा प्रवास १९व्या शतकात सुरू झाला. इ.स. १८८२ मध्ये अमेरिकन संशोधक शुइलर स्केट्स व्हीलर (Schuyler Skaats Wheeler) यांनी पहिला इलेक्ट्रिक पंखा तयार केला. हा पंखा थॉमस एडिसनच्या कंपनीने बाजारात आणला होता. सुरुवातीला हे पंखे औद्योगिक वापरासाठी तयार केले गेले, पण नंतर घरगुती वापरासाठीही सुधारित प्रकार बाजारात आले.
भारतामधील पंख्यांचा प्रवास
भारतामध्ये ब्रिटिशांच्या काळात इलेक्ट्रिक पंखे आले. सुरुवातीला ते केवळ रेल्वे स्टेशन, सरकारी कार्यालये आणि श्रीमंतांच्या घरांत दिसत असत. पण २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत पंखे सर्वसामान्यांच्या घरांमध्ये पोहोचले.
पंख्यांचे प्रकार
आज पंख्यांचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत — छताचे पंखे, टेबल फॅन, एग्झॉस्ट फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन आणि अगदी स्मार्ट फॅनदेखील.
प्राचीन काळातील सुरुवात म्हणून लोकांनी हात पंखाला वापरला. त्या काळी कोणतेही उपकरण नव्हते नंतर शोध लागत गेला आणि उपकरणांच्या आधारे नव्या तत्वाचा शोध लागला आणि त्यापासून शुइलर स्केट्स व्हीलर यांनी इलेक्ट्रिक पंखा बनवला. १८८२ मध्ये शुइलर स्केट्स व्हीलर यांनी शोधला. देशात पंखा ब्रिटिशियनच्या काळात वापटला गेला नंतर देशभरात सर्व सामान्यांनी याचा स्वीकार केला.
पंख्याने मानवी जीवनात आराम आणि सुविधा आणली. उष्णतेच्या दिवसांत थंडावा देणारा हा शोध खरोखरच जग बदलणारा ठरला आहे.