
फोटो सौजन्य: Freepik
भारत हा जेवढा दूध उत्पादनात पुढे आहे तेवढाच तो दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनात पुढे आहे. म्हणूनच तर आपल्याकडे अगदी लहानातील लहान गावात गायी पाहायला मिळतात. आपण अनेक दुग्धजन्य पदार्थ खात असतो पण तूप हा एक असा दुग्धजन्य पदार्थ आहे जो रोज प्रत्येकाच्या जेवणात वापरला जातो.
साजूक तुपातील पुरणपोळी असो की रोजच्या वरण भातात असणारे तूप, आपला प्रत्येक आहार आज देशी तूपाशिवाय अपूर्णच आहे. आपल्याकडे देशी तूप खाण्यामागे सुद्धा एक कारण आहे, ते म्हणजे तुपाचे सेवन आपल्या शरीरास फायदेशीर असते. परंतु काही लोकांसाठी देशी तुपाचे सेवन नुकसानदायक ठरू शकते.
देशी तूप खाण्याचे फायदे आपण ऐकले असतील. जे बऱ्याच अंशी खरे सुद्धा असले तरी काही बाबतीत तुपाच्या सेवनामुळे तोटेही पाहायला मिळू शकतात. सर्वप्रथम तूप हे मर्यादित प्रमाणातच खाल्ले पाहिजे जेणेकरून त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही. चला जाणून घेऊया कोणत्या वैद्यकीय परिस्थितीत आपण देशी तूप सेवन करू नये.