Eye Care: सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळे लाल का दिसू लागतात? दुर्लक्ष केल्यास उद्भवू शकतो गंभीर आजाराचा धोका

Eye Care: सकाळी उठल्यानंतर बऱ्याचदा डोळ्यांमध्ये लालसरपणा जाणवू लागतो. डोळे लाल होण्यासोबतच खाज येणे, वेदना येणे इत्यादी लक्षणे सुद्धा दिसू लागतात. त्यामुळे डोळ्यांच्या समस्यांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
Eye Care: सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळे लाल का दिसू लागतात?
Eye Care: सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळे लाल का दिसू लागतात?
Published on: 
Updated on: 
  • डोळे कशामुळे लाल होतात?

  • डोळ्यांसंबंधित समस्यांची लक्षणे?

  • डोळे लाल होण्याची कारणे आणि उपाय?

Eye Care: बऱ्याचदा सकाळच्या वेळी झोपेतून उठल्यानंतर डोळे खूप जास्त सुजल्यासारखे होतात. तर काहीवेळा डोळे रक्तसारखे लाल दिसू लागतात. डोळ्यांच्या समस्यांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. अपुरी झोप, डोळ्यांमध्ये कोरडेपणा किंवा धूळ-माती डोळ्यात गेल्यामुळे सकाळी उठल्यानंतर लालसरपणा वाढतो. डोळ्यांसंबंधित उद्भवणाऱ्या समस्यांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. कायमच दुर्लक्ष केल्यामुळे गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. डोळ्यांमधील रक्तवाहिनी फुटणे, ॲलजी किंवा संसर्ग, पापण्यांना आलेली सूज इत्यादी कारणांमुळे डोळे लाल होतात आणि डोळ्यांच्या समस्या वाढू लागतात.

Eye Care: सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळे लाल का दिसू लागतात?
Weight Loss Tips: वेट लॉस करायचंय, पण डाएट कसं असावं? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खा 'हे' पदार्थ, वाचा Diet प्लॅन

सकाळी उठल्यानंतर डोळे लाल होण्याची कारणे?

सकाळी उठल्यानंतर डोळे लाल होण्याच्या समस्येला सबकंजंक्टिव्हल हेमरेज असे वैद्यकीय भाषेत म्हंटले जाते. यामुळे डोळ्याच्या पांढऱ्या भागावर असलेली छोटी रक्तवाहिनी फुटते आणि डोळ्याच्या पांढऱ्या भागावर रक्त साचल्यासारखे लालसर डाग तयार होतात. जोरात खोकला येणं, शिंक येणं, डोळे जोरात चोळणं किंवा जड वजन उचलल्यामुळे डोळ्यांची रक्त वाहिनी फुटण्याची जास्त शक्यता असते.

डोळ्यांची रक्तवाहिनी फुटल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • डोळ्याच्या पांढऱ्या भागावर रक्ताचा गडद लाल किंवा चमकदार ठिपका तयार होणे.

  • डागाचा रंग लालवरून तपकिरी, जांभळा किंवा पिवळसर होणे.

  • डोळ्यांमध्ये जडपणा जाणवणे.

  • सौम्य खाज सुटणे किंवा काहीतरी टोचल्यासारखे वाटणे.

  • डोळ्यांमध्ये वेदना होणे.

Eye Care: सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळे लाल का दिसू लागतात?
Health tips: तुमच्या घरातही येतेय का अस्वच्छ पाणी? पाणी स्वच्छ करण्यासाठी करा हे ८ सोपे उपाय!

डोळ्यांमध्ये वाढलेल्या कोरडेपणामुळे सुद्धा डोळे लालसर होण्याची शक्यता असते. झोपताना डोळ्यांमधील ओलावा कमी झाल्यानंतर सकाळी डोळे लाल दिसतात. पंखा किंवा एसीची हवा थेट डोळ्यांवर लागत असेल तर डोळे कोरडे होऊन जातात. डोळे लाल होण्यामागे कंजंक्टिव्हायटिस सुद्धा कारणीभूत ठरू शकते. संसर्ग झाल्यानंतर डोळे लाल होणे किंवा डोळ्यांमधून पाणी येऊ लागते. तर काहीवेळा पापण्यांवर चिकट पदार्थ किंवा घाण जमा होऊन राहते. डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोळे लाल होणे किंवा पापण्यांवर खपल्या जमा होणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.