पहाटेच्या वेळी अनेकांना हृदयविकाराचा झटका का येतात?
भारतासह जगभरात सगळीकडे हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवसआधी शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. मात्र शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करून आरोग्याची योग्य ती काळजी घेतली जात नाही. चुकीची जीवनशैली, कामाचा तणाव, आहारात होणारे बदल, मानसिक ताण, अपुरी झोप आणि सतत बिघडलेल्या पचनक्रियेचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. रोजच्या आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये किंवा शरीराच्या इतर अवयवांवर कोलेस्ट्रॉल जमा होण्यास सुरुवात होते. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. कोलेस्ट्रॉलचा पिवळा चिकट थर रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो आणि रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. ज्यामुळे शरीराच्या रक्तभिसरणात अनेक अडथळे निर्माण होतात.(फोटो सौजन्य – istock)
हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची जास्त भीती असते. शरीराच्या रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यानंतर किंवा ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यानंतर कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येण्याची जास्त भीती असते. तसेच अनेकांना रात्रीच्या वेळी किंवा पहाटे हार्ट अटॅक येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पहाटे हार्ट अटॅक का येतो? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. रात्री शांत आणि चांगल्या झोपेमुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. रात्री झोपल्यानंतर शरीर रिलॅक्स मोडमध्ये असते, ज्यामुळे हृदयाची गती कमी होऊन जाते. तसेच शरीराचा रक्तदाब अतिशय सामान्य असतो, ताणतणावाचे हार्मोन्स नियंत्रित राहतात. त्यानंतर सकाळ होताच हृदयाची गती पूर्वरत होते. पण पहाटेच्या वेळी शरीरात कोर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढायला लागतो, ज्यामुळे हृदयाची गती आणि रक्तदाब अचानक वाढू लागतो. रक्तदाब वाढल्यानंतर हृदयावर अचानक ताण येऊन आणि कोणत्याही वेळी हार्ट अटॅक येण्याची शकता असते.
सकाळच्या वेळी हळूहळू शरीरात रक्त तयार होण्यास सुरुवात होते आणि प्लेटलेट्स अधिक सक्रिय होऊन जातात. ज्यामुळे काहीवेळा रक्तात क्लॉट्स होऊन रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात. ज्या रक्तवाहिन्यांमध्ये आधीपासूनच प्लाक साचून असतो, तिथेच क्लॉट्स तयार झाल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि हार्ट अटॅक येतो.
सर्दीला म्हणा गुडबाय! गरम पाण्याची वाफ घेताना पाण्यात टाका ‘हे’ बारीक दाणे, छातीतील कफ होईल मोकळा
थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या वेळी वेत ऑक्सिजनचे प्रमाण अतिशय कमी असते. अशावेळी हृदयाच्या समस्येनी त्रस्त असलेल्या लोकांना किंवा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असणाऱ्या लोकांना हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढू लागतो. सकाळी झोपेतून उठल्यानंतर लगेच उभे राहू नये. काहीवेळा अंथरुणामध्ये शांत पडून राहावे. यामुळे शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि शरीर सक्रिय होते. तसेच हृदयाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी थंडीच्या दिवसांमध्ये बाहेर फिरण्यास जाऊ नये.
हृदयविकाराचा झटका म्हणजे काय?
हृदयविकाराचा झटका, ज्याला वैद्यकीय भाषेत “मायोकार्डियल इन्फ्रक्शन” म्हणतात, तेव्हा होतो जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणारी एखादी रक्तवाहिनी (coronary artery) पूर्णपणे किंवा अंशतः अवरोधित होते. यामुळे हृदयाच्या स्नायूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि स्नायू damaged किंवा dead होतात.
हृदयविकाराच्या झटक्याची सामान्य लक्षणे:
छातीत दुखणे किंवा अस्वस्थता: हे दुखणे छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला जाणवू शकते. काहीवेळा हे दुखणे दाबल्यासारखे किंवा पिळल्यासारखे वाटू शकते.शरीराच्या इतर भागांमध्ये वेदना: वेदना छातीतून हाताकडे (विशेषतः डाव्या हाताला), जबड्याकडे, मानेकडे, पाठीवर किंवा पोटात पसरू शकते., श्वास घेण्यास त्रास होणे, अति घाम येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
हृदयविकाराच्या झटक्याची कारणे:
धूम्रपान, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, मधुमेह, and कौटुंबिक इतिहास (अनुवंशिकता).