Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

का वाढतेय बहिरेपणाची समस्या? कशी घ्याल तुमच्या कानाची काळजी? तुम्हाला कानाविषयी हे माहिती आहे का?

तुम्ही न चुकता एअर पॉडस् घालतायत? जोरजोरात गाणी ऐकताय? हँड्स फ्रीवरून गप्पा मारतायत? हे सगळं वारंवार करत असाल तर आताच थांबवा....कारण, यामुळे तुम्हाला बहिरेपणा येण्याची शक्यता आहे. ENT स्पेशालिस्टकडे सध्या अशा अनेक पेशंटची गर्दी वाढू लागली आहे...काय आहे कानामागची गोष्ट वाचा....

  • By Madhuraa Saraf
Updated On: Jun 14, 2023 | 02:45 PM
का वाढतेय बहिरेपणाची समस्या? कशी घ्याल तुमच्या कानाची काळजी? तुम्हाला कानाविषयी हे माहिती आहे का?
Follow Us
Follow Us:

आजकाल सर्वांच्या कानात एअर पॉडस् दिसतात. कोणी बोलण्यासाठी तर कोणी गाणी ऐकण्यासाठी याचा वापर करतात. मात्र,यामुळे अनेकांना कानाच्या विविध विकारांना सामोरं जावं लागतयं. ऐकू न येणे ही समस्या साधारणपणे वयाची साठी सत्तरी उलटल्यानंतर निर्माण होते. मात्र, आजच्या तरूणपिढीला कानाच्या विविध त्रासांनी त्रस्त केलं आहे.

कानाच्या दुखापतीवर उपचार

कानात दुखापत झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. कानात संसर्ग आणि ऍलर्जीचा धोकाही असतो. यासाठी कानांची काळजी घेणे आवश्यक आहे. दुखापत झाल्यास डॉक्टरांना दाखवा.

कानाला दुखापत होण्याऱ्या गोष्टीपासून बचाव

कानाला होणारी दुखापत टाळता येते. खेळ खेळताना किंवा कान साफ ​​करताना दुखापत होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. कानाच्या आरोग्यासाठी मोठ्या आवाजापासून दूर राहणे गरजेचे आहे. आजच्या काळात मोठ्या आवाजामुळे जगभरात बहिरेपणाचा आजार झपाट्याने वाढताना दिसत आहे.

कानात तेल घालावे की नाही?

कानात तेल टाकल्याने कानातील घाण बाहेर निघते हा समज चुकीचा आहे. उलट कानात तेल टाकल्याने कानात संसर्ग होतो. इतकचं नाही तर कानात तेल टाकल्याने कानाचा पडदादेखील खराब होऊ शकतो. कानात तेल टाकल्याने ऑटो मायकोसिस हा आजार होऊ शकतो, ज्यामुळे कायमस्वरूपी श्रवण अक्षमतेची समस्या उद्भवू शकते.

कानात खाज सुटत असेल किंवा दुखत असेल तर सावध व्हा

कानात तेल टाकल्याने किंवा पाणी गेल्याने त्यात अनेक दिवस ओलावा तसाच राहतो. त्यामुळे कानात धूळ साचते, संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे,आंघोळीनंतर कान आतल्या बाजुने कोरडा करणे महत्वाचे आहे.

[read_also content=”चेह-याचं सौंदर्य वाढवण्यासाठी दिवसातून दोन वेळा तरी चेहरा धुवा https://www.navarashtra.com/lifestyle/416120-416120/”]

 

कानातील मळ आणि त्याबाबतच्या महत्वाच्या गोष्टी- (इअर वॅक्सच्या)

  • इअरवॅक्स हा शरीरातील एक पदार्थ आहे
  • हे शरीरात प्रदूषकांचे संचय दर्शवते
  • त्यामुळे शरीरातील काही आजारही ओळखता येतात.
इअरवॅक्समध्ये सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म
  • कानाच्या मळामध्ये मेण असते
  • पेशींमधून मृत केराटिन साइट्स पासून ते तयार होतात
  • 1,000 ते 2,000 ग्रंथी सूक्ष्मजीवविरोधी पेप्टाइड्स बनवतात
  • पुरुष आणि स्त्रियांमध्ये समान प्रमाणात कानातील मळ तयार होतो
  • इअरवॅक्समध्ये लाइसोझाइम देखील असतो जो एक अँटी-बॅक्टेरियल एन्झाइम आहे.
‘इअर स्कम‘चाही म्हणजे कानातील मळाचा देखील उपयोग होतो
  • कान स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत होते
  • कानाच्या सेलवर जमलेल्या थराचे संरक्षण करते
  • धूळ आणि पाण्यापासून कानाचे रक्षण करते
  • संसर्ग टाळण्यास मदत होते
  • कानाच्या पेशी स्वतःची स्वच्छता करतात

‘कानात मळ‘ ही समस्या कधी निर्माण होते?

जेव्हा आपण खाताना किंवा चघळताना जबडा हलवतो, तेव्हा कानातले मेण आणि त्वचेच्या पेशी हळूहळू कानाच्या पडद्यातून बाहेरच्या छिद्राकडे जातात. इअरवॅक्स ही समस्या नाही, परंतु जास्त प्रमाणात वाढल्यास अडथळा येऊ शकतो. यामुळे कानात दुखणे आणि ऐकणे कमी होऊ शकते.

कान स्वच्छ करण्याचे सोपे उपाय – 

कोमट पाणी : कापूस घेऊन तो पाण्यात भिजवून त्याने पाणी कानात टाका. काही सेकंदात पाणी बाहेर काढा.

हायड्रोजन पॅरॉक्साइड : अतिशय कमी प्रमाणात हायड्रोजन पराक्साइड घेवून तो पाण्यात टाका. थोड्या प्रमाणात ते कानात टाका आणि आता कान उलटून काही सेकंदात ते बाहेर काढा.

तेल : ऑलिव्ह, शेंगदाणा किंवा मोहरीचं तेल गरम करुन कानात टाकणे हा देखील सोपा उपाय आहे. तेलात जरासं लसूण टाकला तरी चालतो. यामुळे मळ बाहेर पडतो.

कांद्याचा रस : कांदा वाफेवर शिजवून किंवा भाजून याचा रस काढून घ्या. त्यानंतर कापसाने रसाचे काही थेंब कानात टाका. याने मळ बाहेर पडतो.

मीठाचे पाणी : गरम पाण्यात मीठ घोळून टाकून त्याचे काही थेंब कानात टाका आणि काही सेकंदात ते बाहेर काढा.

Web Title: Why ear care is important

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2023 | 02:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.