
पाय कोमट पाण्यात भिजवा
दिवसातून एकदा 10-15 मिनिटे कोमट पाण्यात पाय भिजवा. यामुळे मृत त्वचा मऊ पडते आणि भेगा भरून येण्यास मदत होते. पाण्यात थोडे मीठ किंवा एपीसम सॉल्ट टाकल्यास अतिरिक्त आराम मिळतो.
मॉइश्चरायझर किंवा हील क्रीम लावणे गरजेचे
टाचभेगांसाठी विशेष क्रीम्स वापरा. नसल्यास नारळ तेल, तूप, ग्लिसरीन आणि व्हॅसलीनचे मिश्रणही उत्तम मॉइश्चरायझर ठरते. रात्री लावून कॉटनचे मोजे घातल्यास परिणाम अधिक चांगला दिसतो.
घरगुती स्क्रब वापरा
साखर + मध + ऑलिव्ह तेल यांचा हलका स्क्रब आठवड्यातून 2 वेळा वापरल्यास मृत त्वचा निघते आणि टाचा मऊ राहतात. पुमिक स्टोनचा वापरही सुरक्षितरीत्या करू शकता.
दिवसभर पाय कोरडे ठेवू नका
बराच वेळ नंगे पाय राहिल्यास त्वचा अधिक कोरडी पडते. घरामध्येही हलके, मऊ सोल असलेले चप्पल घाला.
पाणी आणि आहार महत्त्वाचा
पुरेसं पाणी पिणं, सुकामेवा, बिया, तेलकट मासे, आणि व्हिटॅमिन–E युक्त पदार्थ खाल्ल्याने त्वचेची नैसर्गिक आर्द्रता टिकते.
टाचांमध्ये खोल भेगा, सतत रक्तस्राव, वेदना किंवा सूज दिसत असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. हिवाळ्यातील या सोप्या टिप्स आपल्या दैनंदिन रुटीनमध्ये घेतल्यास टाचांचा कोरडेपणा कमी होऊन भेगा पटकन भरून येतात. वेळेत काळजी घेतली तर हा त्रास पूर्णपणे टाळता येऊ शकतो!