रात्री झोपताना केसं मोकळे ठेवावेत की बांधावेत
बदलत्या वातावरणानुसार केसांची विशेष काळजी घेणे फार गरजेचे असते. केसांची पुरेपूर काळजी न घेतल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. निरोगी केसांसाठी केसांना तेल लावणे फार गरजेचे आहे. यामुळे केस गाळण्याच्या समस्येपासून दूर राहता येते. आरोग्यदायी पद्धतीने केसांचे पालन केले तर केस निरोगी राहण्यास मदत होते. अनेकदा महिलांना झोपताना केस मोकळे करून झोपावे की बांधून ते समजत नाही. यातील कोणता प्रकार केसांसाठी लाभदायक आहे, ते आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
काहींना आपले केस मोकळे ठेवून झोपायला आवडते तर काहींना आपले केस बांधून झोपायला आवडते. मात्र जर तज्ज्ञांचा सल्ला ऐकला तर, जेव्हा आपण आपले केस मोकळे ठेवून झोपतो तेव्हा ते तुटण्यासह तर समस्या वाढवू शकतात. त्यामुळेच नेहमी केस बांधून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. खरं तर केस मोकळे ठेवावे की नाहीत हा सर्वस्वी त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.
केस कमी गळतात
रात्री झोपताना केसं बांधून ठेवल्याने केसगळती कमी होते. जेव्हा आपण केसं मोकळे ठेवून झोपतो तेव्हा केसांमधील कोरडेपणा वाढू लागतो. उशी केसांचा ओलावा शोषून घेते, ज्यामुळे आपली केसं आणखीनच कोरडी आणि निर्जीव होऊ लागतात. यामुळे सकाळी उठल्यावर उशीभोवती तुटलेले केस दिसतात. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार केस बांधून झोपणे फायद्याचे ठरेल.
केसांना चमक येते
रात्री झोपताना केसांना विंचरू नयेत असा अनेकांचा समज आहे. मात्र रात्री केसांना विंचरून झोपल्याने केसांचा गुंता होत नाही. जेव्हा केसांचा गुंता होत नाही तेव्हा ते जास्त तुटत नाहीत. त्यामुळे झोपण्यापूर्वी केसांना चांगली कोम्बिंग करा यामुळे तुमचे केस अधिक तुटणार नाहीत.
केस मऊ होतील
रात्री झोपताना केसांना मसाज करा. असे तुम्ही आठवड्यातून दोनदा, तीनदा करू शकता. झोपण्यापूर्वी मसाज केल्याने केसांना चमक येते. जेव्हा तुम्ही मसाज करता तेव्हा टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे केसांना सर्व आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात. यामुळे तुमचा ताणही कमी होईल आणि आपोआप तुमच्या केस मऊ होतील.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.