Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांधेदुखीचा त्रास झाल्यास चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, सूज आणि वेदनांचा त्रास आणखी वाढणार

तुम्हीही संधिवाताचे रुग्ण असाल तर तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्या. काही खाद्यपदार्थ आहेत ज्यामुळे सांधेदुखी वाढते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 11, 2023 | 03:51 PM
सांधेदुखीचा त्रास झाल्यास चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, सूज आणि वेदनांचा त्रास आणखी वाढणार
Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी 12 ऑक्टोबर हा जागतिक संधिवात दिवस (World Arthritis Day 2023) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे संधिवाताचा वाढता धोका कमी करण्यासाठी लोकांना जागरूक करणे. तुम्हीही संधिवाताचे रुग्ण असाल तर तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्या. काही खाद्यपदार्थ आहेत ज्यामुळे सांधेदुखी वाढते. त्यामुळे जर तुम्ही देखील संधिवाताचे रुग्ण असाल तर तुम्हाला तुमचा आहारात काही बदल करण्याची गरज आहे. सांधेदुखीच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

[read_also content=”हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण करून केलेली मुलगी जिवंत! आईने केला दावा, जर्मन सरकरकडे मदतीची याचना https://www.navarashtra.com/world/tatoo-artist-shani-louk-believed-killed-by-hamas-terrorists-in-israel-is-alive-claims-mother-nrps-468480.html”]

अतिरिक्त साखर

गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे सांधेदुखीचा त्रास झपाट्याने वाढतो. जर तुम्हाला वारंवार सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाणे टाळावे. चॉकलेट, सोडा, कँडी, रस, गोड पेये, अगदी काही सॉसमध्ये साखर असते. या गोष्टींमुळे सांधेदुखीचा त्रास वाढतो.

ग्लूटेन असलेले अन्न

ग्लूटेन हे एक प्रथिन आहे जे नैसर्गिकरित्या गहू, ज्वारी आणि मोहरीमध्ये आढळते. ग्लूटेनयुक्त अन्न खाल्ल्याने संधिवात होण्याचा धोका वाढतो, त्यामुळे संधिवात रुग्णांच्या आहारातून ग्लूटेन कमी करणे फायदेशीर ठरू शकते.

प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ

प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजे जंक फूड हे खाण्यास अतिशय चविष्ट असले तरी ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. त्यात शुद्ध साखर आणि शुद्ध अन्नधान्य वापरले जाते, ज्यामुळे संधिवात वेदना आणि सूज आणखी वाढते. सांधेदुखीच्या रुग्णांनी असे पदार्थ खाणे टाळावे.

दारू

जास्त मद्यपान केल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. याशिवाय मद्यपानाचे नियमित सेवन केल्याने सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. ज्या लोकांना आधीच संधिवात आहे, मद्यपान केल्याने त्यांची स्थिती आणखी वाईट होऊ शकते.

अतिरिक्त मीठाचं सेवन

अतिरीक्त काहीही आरोग्यास हानी पोहोचवू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जेवणातील मीठाचे प्रमाणही कमी केले पाहिजे.  पाकीटातील पदार्थांमध्ये अतिरिक्त मीठ असते. सांधेदुखीच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात मीठाचा कमी प्रमाणात समावेश करावा.

Web Title: World arthritis day 2023 some food you should avoid if you are suffering from arthritis nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2023 | 03:44 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.