
World Brain Tumor Day
ब्रेन ट्यूमर ही सध्या वाढीला लागलेली समस्या आहे. सध्या ही समस्या तरूणांमध्ये अधिक प्रमाणात वाढत असलेली दिसून येत आहे. मात्र उपचाराचे परिणाम चांगले होऊन आयुष्य सुकर व्हावे यासाठी वेळीच निदान आणि उपचार महत्वाचे असतात. तरूणांमधील ब्रेन ट्यूमरची सुरुवातीची लक्षणे ओळखण्याकडे मुलांचे पालक, त्यांची काळजी घेणारे तसेच डॉक्टर यांनी जागरूक असणे आवश्यक आहे.
फोर्टीस हॉस्पिटल मुलुंड आणि कल्याण येथील डॉ. जयेश सरधारा, सीनियर कन्सलटंट न्यूरो अँड स्पाईन सर्जरी आणि सात्यकी बॅनर्जी, कार्यकारी संचालक आणि गट मुख्य कार्यकारी अधिकारी, त्रिविट्रॉन हेल्थकेअर यांचा सल्ला आपल्या सगळ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. (फोटो सौजन्य – iStock)
प्रकार आणि व्यापकता
लहान मुलांमध्ये आढळणारा आणि मोठ्या माणसातील ब्रेन ट्यूमर मध्ये फरक असतो. मेडुलोब्लास्टोमास, ग्लिओमास (जसे की पायलोसाइटिक ॲस्ट्रोसाइटोमास), एपेन्डीमोमास आणि ब्रेनस्टेम ग्लिओमास हे ब्रेन ट्यूमरचे सामान्य प्रकार आहेत. हे ट्यूमर्स मेंदू आणि पाठीच्या कण्यातील विविध भागात विकसित होतात, त्यांच्या वाढीचे प्रमाण आणि कुठे विकसित होतात त्यानुसार वेगवेगळी लक्षणे जाणवतात.
[read_also content=”ब्रेन ट्यूमरचे प्रकार, कारणे, लक्षणे, उपचार https://www.navarashtra.com/lifestyle/brain-tumor-symptoms-types-causes-and-treatment-537650.html”]
सुरुवातीची लक्षणे आणि चिन्हे
लहान मुलांमध्ये सुरुवातीला दिसणारी लक्षणे सौम्य असल्याने त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. तरीदेखील सातत्याने वाढत जाणारा त्रास काळजीचे कारण ठरू शकतो. पुढील लक्षणांकडे लक्ष ठेवणे आहे:
त्वरीत निदानाचे महत्त्व
सुरुवातीची चिन्हे ओळखून त्वरित वैद्यकीय तपासण्या करणे आवश्यक आहे. वेळीच निदान केल्यास वेगवेगळे उपचार करता येतात,जे कमी आक्रमक आणि अधिक प्रभावीअसे असू शकतात. बालरोगतज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट ब्रेन ट्यूमरच्या अचूक निदानासाठी एमआरआय आणि सीटी स्कॅनसारख्या प्रगत इमेजिंग तंत्रांचा वापर करतात.
प्रगत उपचार
लहान मुलातील ब्रेन ट्यूमर उपचारात प्रामुख्याने शस्त्रक्रिया, रेडीएशन थेरपी आणि केमो थेरपीचा एकत्र वापर केला जातो. प्रोटॉन बीम थेरपी आणि टारगेटेड थेरपी सारख्या प्रगत तंत्राने अचूक आणि कमी त्रासदायक उपचार करणे शक्य झाले आहे. मेंदूच्या इतर चांगल्या भागावर फारसा परिणाम न होऊ देता फक्त ट्यूमरच्या पेशी काढून टाकणे हा या पद्धतींचा उद्देश आहे.
तरुणपणातील ब्रेन ट्यूमरच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल जागरूक असणे पालक, मुलांची काळजी घेणारे आणि डॉक्टर यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.उपचाराचे परिणाम चांगले होऊन आयुष्य सुकर व्हावे यासाठी वेळीच निदान आणि उपचार महत्वाचे असतात. तंत्रज्ञान आणि उपचार पद्धती यामध्ये होणाऱ्या प्रगतीने ब्रेन ट्यूमर असलेल्या तरुण रूग्णांचा दृष्टीकोन अधिकाधिक आशादायी होत आहे.