Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Ovarian Cancer Day: सायलंट किलर आहे महिलांसाठी ओव्हरियन कॅन्सर, साधा आजार समजून लक्षणांकडे केले जाते दुर्लक्ष

महिलांमध्ये अंडाशयाचा कर्करोग हा एक सायलंट किलर आजार मानला जातो, त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. ओव्हरियन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे काय आहेत आणि तुम्ही ते कसे टाळू शकता

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 08, 2025 | 10:23 AM
ओव्हरियन कॅन्सरबाबत जागरूकता हवी (फोटो सौजन्य - iStock)

ओव्हरियन कॅन्सरबाबत जागरूकता हवी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

कर्करोग हा एक धोकादायक आणि घातक रोग आहे ज्यामध्ये बरेच प्रकार आहेत. यापैकी एक म्हणजे ओव्हरियन कॅन्सर जो स्त्रियांमध्ये होतो. याला ‘सायलेंट किलर’ असेही म्हणतात, म्हणजे कर्करोग ज्यामुळे शरीरामध्ये होणारी हानी ही अत्यंत शांतपणे होते आणि त्याची प्रारंभिक लक्षणे खूप सौम्य आहेत किंवा अजिबात दिसत नाहीत.

जागतिक अंडाशयाचा कर्करोग दिवस दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा हेतू ओव्हरियन कॅन्सर अर्थात अंडाशयाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता वाढविणे आहे. हा महिलांमध्ये सर्वात कमी निदान झालेला कर्करोग आहे. अंडाशयाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे लक्षात न येतात कारण स्त्रिया बर्‍याचदा त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना किरकोळ समस्या असल्याचे समजते.

पोटात सतत गॅस निर्माण होणे, थकवा किंवा हार्मोनल बदल ही लक्षणे आहेत ज्याकडे जास्त लक्ष मिळू शकत नाही. तथापि, कर्करोग त्याच्या गंभीर टप्प्यावर पोहोचला तेव्हाच योग्य निदान केले जाते. ओव्हरियन कॅन्सरची प्रारंभिक लक्षणे काय आहेत आणि आपण त्यास कसे प्रतिबंधित करू शकता हे आपण आज या लेखातून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock) 

काय सांगतात तज्ज्ञ

डॉ. अनुरंजिता पल्लवी, स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी सांगितले की, अंडाशयाचा कर्करोग (ओव्हेरियन कॅन्सर) हा जगभरातील महिलांना प्रभावित करणार्‍या सर्वात घातक कर्करोगांपैकी एक आहे. त्याची चिन्हे आणि लक्षणे वेळीच ओळखून त्वरीत उपचार करणे गरजेचे आहे.अंडाशयाचा कर्करोग तेव्हा होतो जेव्हा अंडाशयातील कर्करोगाच्या पेशी वाढू लागतात आणि हळूहळू पसरतात. 

कॅन्सर होण्याआधी शरीर देत असतो ‘हे’ संकेत, याकडे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला खुले आमंत्रण! वेळीच सावध व्हा

ओव्हरियन कॅन्सरची कारणे?

ओव्हरियन कॅन्सर म्हणजे काय

स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगानंतर संपूर्ण भारतात महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर हा एक सामान्यपणे आढळून येणारा कॅन्सर आहे. ४५ ते ६५ वयोगटातील महिलांमध्ये हा कर्करोग झपाट्याने वाढत आहे. अंडाशय हे स्त्री हार्मोन्स इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे मुख्य स्त्रोत देखील आहेत. 

नेमके कारण अनिश्चित असले तरी, अनेक जोखीम घटक या कर्करोगास कारणीभूत ठरतात जसे की वय (विशेषतः ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला), बीआरसीए१ आणि बीआरसीए२ सारखे अनुवांशिक घटक, अंडाशय किंवा स्तनाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास, एंडोमेट्रिओसिस, लठ्ठपणा आणि हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी यांचा समावेश आहे. या कर्करोगाच्या लक्षणांबद्दल फारशी जागरूकता नसल्यामुळे उपचारास विलंब होतो.

अंडाशयाच्या कर्करोगाची  लक्षणे

  • सतत पोट फुगणे किंवा पोटात सूज येणे: महिलांमध्ये पोट फुगण्याची समस्या जे काही केल्या कमी होत नाही हे देखील गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. बहुतेकदा पचनाच्या समस्या म्हणून याकडे दुर्लक्ष केले जाते
  • ओटीपोटात वेदना : जर तुम्हाला मासिक पाळीशी संबंधित नसलेल्या आणि अस्वस्थता निर्माण करणाऱ्या वेदना ओटीपोटात जाणवत असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. गर्भाशयाच्या कर्करोगामुळे ही समस्या आढळून येऊ शकते. डॉक्टरांना वेदनामागील मूळ शोधू द्या
  • पोट भरल्यासारखे वाटणे : थोडेसे खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटणे हे गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. वाढत्या ट्यूमरमुळे पोटावर येणाऱ्या दबावाने लवकर पोट भरल्यासारखे वाटू शकते. म्हणून नेहमी सावध रहा आणि लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
  • वारंवार लघवी करणे : तुम्हाला वारंवार लघवी करावीशी वाटते आहे का? महिलांनो, सावधगिरी बाळगा, कारण हे देखील गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

Cancer Awareness Month: केवळ पुरूषांनाच लक्ष्य करतात ‘हे’ कॅन्सर, 7 लक्षणे दिसताच डॉक्टरांना गाठाच

निदान आणि उपाय 

अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी आणि वेळेवर उपचार सुरू करण्यासाठी महिलांना पेल्विक तपासणी, अल्ट्रासाऊंड किंवा सीटी स्कॅन सारख्या इमेजिंग चाचण्या आणि रक्त चाचण्या (CA-125 सह) करण्याचा सल्ला दिला जातो.

उपचार नक्की काय घ्यायचे असा अनेकांना प्रश्न पडतो. शस्त्रक्रियेच्या माध्यमातून ट्यूमर आणि प्रभावित ऊती काढून टाकल्या जातील, त्यासाठी केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी किंवा हार्मोन थेरपीचा वापर केला जाईल. गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे वेळीच ओळखणे आव्हानात्मक असून, योग्य तंत्रज्ञानाचा वापर करुन तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने वेळीच उपचार सुरू करून गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान करणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: World ovarian cancer day know details about what is ovarian cancer causes symptoms treatment prevention in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 10:23 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.