वर्धा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी – नाले तुडूंब भरून वाहत आहेत. अनेक भागातील पिके पाण्याखाली आली असून, ब-याच गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. पावसाचे पाणी प्रकल्पात वाढल्याने धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाचे (Lower Wardha Project ) ११ दरवाजे (11 doors ) बुधवारी मध्यरात्री १.४५ वाजता ६० सेमीने उघडण्यात (opened by 60 cm) आले आहेत. सदर प्रकल्पातून ५६७ घन.मी/से.पाणी (567 cubic m/s of water) वर्धा नदीपात्रात सोडण्यात (Wardha river basin) येत आहे.
प्रकल्पाची आजची पाणीपातळी २८२.४८० मीटर (६५.१७ टक्के) इतकी झाली आहे. याशिवाय लाल नाला प्रकल्पाचे दोन गेट ५ से. मी. ने उघडण्यात आले आहेत. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीपातळीत कमालाची वाढ झाली आहे.
पोथरा वर्धा व कार नदी ओव्हरफ्लो
जून महिन्यात जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीपातळी कमी झाल्याने प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. पण, जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसाने प्रकल्पातील पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. जिल्ह्यातील पोथरा व वर्धा (Pothara and Wardha) कारनदी प्रकल्प (Karandi projects) ओव्हरफ्लो (overflow) झाले असून, इतर प्रकल्पातील पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे.
मार्च महिन्यात जिल्ह्यातील अनेक प्रकल्पातील पाणीसाठा ब-यापैकी असताना एप्रिल महिन्याच्या शेवटी त्यात मोठी घट झाली होती. तर मे व जून महिन्यात बहुतांश जलाशयातील पाणीपातळी कमालाची घटली होती. मात्र, जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे जलाशयांना मोठा दिलासा मिळाला आहे. वर्धा पाटबंधारे विभागाअंतर्गत (Wardha Irrigation Division) वर्धा जिल्ह्यात ११ तर अमरावती जिल्ह्यात ४ असे एकूण १५ मोठे प्रकल्प आहेत. सदर प्रकल्पावरून वर्धा व अमरावती जिल्ह्याला (Amravati District) पाणीपुरवठा केला जातो. वर्धा शहराची तहानही याच प्रकल्पावरून भागविली जाते.