Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंधुकन्येचा ‘नॅशनल आर्चरी’ स्पर्धेत बोलबाला; १२ वर्षीय अक्साने पटाकावले सुवर्णपदक

सिंधुदुर्गातील आक्सा शिरगावकर हिने नॅशनल आर्चरी चॅम्पियनशीप २०२४ - २५ या स्पर्धेत तब्बल दोन सुवर्णपदकांना गवसणी घातली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 22, 2025 | 07:23 PM
सिंधुकन्येचा ‘नॅशनल आर्चरी’ स्पर्धेत बोलबाला; १२ वर्षीय अक्साने पटाकावले सुवर्णपदक
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली / भगवान लोके : राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धेत ‘सिल्व्हर‌‌ मेडल’ प्राप्त करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अक्सा मुदस्सर शिरगांवकर या‌ १२ वर्षीय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कन्येने मध्यप्रदेश येथे सुरू असलेल्या एनटीपीसी नॅशनल आर्चरी चॅम्पियनशीप २०२४ – २५ या स्पर्धेत तब्बल दोन सुवर्णपदकांना गवसणी घातली. अक्सा हिने १३ वर्षांखालील ‘कंपाऊंड आर्चरी’मधील स्कोरींग राऊंड’ आणि ‘इलिमिनेशन‌ राऊंड’ अशा दोन प्रकारांमध्ये सुवर्णपदके प्राप्त केली‌ आहेत. अक्सा आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज होणार आहे. अर्थातच अक्सा हीची कामगिरी केवळ सिंधुदुर्गसाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी दमदार, अभिमानास्पद ठरली आहे.

स्कोरींग राऊंड’ स्पर्धा शुक्रवार, २१ मार्चला‌ तर ‘इलिमिनेशन राऊंड’ स्पर्धा शनिवार, २२ मार्चला पार पडली. विशेष म्हणजे ‘कंपाऊंड आर्चरी’मधील‌ सांघिक प्रकारातही अक्सा हिचा‌ महाराष्ट्राच्या संघात समावेश होता. या संघाने देखील ‘सिल्व्हर‌ मेडल’ प्राप्त केले असून त्यातही अक्सा हिची कामगिरी लक्षणीय आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन वर्षांचा प्रवास असलेली अक्सा ही सलग दोन वर्षे सदरच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन यांच्यातर्फे गतवर्षी अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अक्सा हिने १३ वर्षांखालील गटात ‘गोल्ड मेडल’ प्राप्त करून नादियाड (राज्य गुजरात) येथील राष्ट्रीय स्पर्धेत निवड पक्की केली होती. त्या स्पर्धेत अक्सा हिने पाचवी ‘रँक’ प्राप्त केली होती. तर यावर्षी डेरवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अक्सा हिने १३ व १५ वर्षांखालील गटात ‌तब्बल तीन’सिल्व्हर मेडल’ प्राप्त करून गुंटूर येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड पक्की केली व त्यात दुहेरी सुवर्णवेधही घेतला आहे.

गुंटूर (राज्य मध्यप्रदेश) येथील एनटीपीसी नॅशनल आर्चरी चॅम्पियनशीप २०२४ – २५ स्पर्धेत १३ वर्षांखालील ‘कंपाऊंड आर्चरी’‌ प्रकारात देशभरातील सर्वच राज्यांतून ‘सिलेक्टेड’ १०० खेळाडू सहभागी झाले होते. गतवर्षी ‘गोल्ड‌ मेडल’ प्राप्त झालेल्या स्पर्धकाचाही या स्पर्धेत सहभाग होता. अक्सा हिच्या जबरदस्त कामगिरीमुळे त्या स्पर्धकाला यावर्षी ‘सिल्व्हर‌ मेडल’वर‌ समाधान मानावे लागले. ‘इलिमिनेशन‌ राऊंड’मधील‌ ‘टाय’ झालेल्या अंतिम लढतीत ‘वन‌ ऍरो शुट’मध्ये अखेर अक्सा हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

लहानपणापासूनच नेमबाजीची आवड लागलेल्या अक्सा हिने दोन वर्षांपूर्वी सातारा येथील प्रविण सावंत यांच्या दृष्टी ऍकॅडमीमध्ये प्रशिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केली. अवघ्या दोन वर्षांमध्येच तिने विविध स्पर्धांमध्ये पदकांना गवसणी घातली. यात वरील सर्व स्पर्धांसह इतरही अनेक स्पर्धांचा समावेश आहे. यामध्ये सीबीएसई बोर्डातर्फे पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत पाचवी ‘रँक’ प्राप्त करुन तिने राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली होती. तीच राष्ट्रीय स्पर्धा नवी दिल्ली येथे पार पडली, तेथेही अक्सा हिने सहावी ‘रँक’ प्राप्त केली. नादियाड (राज्य गुजरात) येथे झालेल्या ‘नॅशनल‌ स्कुल गेम्स ऑफ आर्चरी २०२४ – २५’मध्ये अक्सा हिने ‘कंपाऊंड’ प्रकारात महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. या संघाने स्पर्धेत ‘सिल्व्हर मेडल’ प्राप्त केले होते.

गुंटूर येथे आता सुरू असलेल्या राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत अक्सा ही १५ वर्षांखालील ‘कंपाऊंड आर्चरी’ स्पर्धेसाठीही पात्र ठरली आहे. ही‌‌ स्पर्धा २७ ते २९ मार्च या कालावधीत होणार आहे. १५ वर्षांखालील‌ स्पर्धेत देशभरातील मातब्बर खेळाडूंचा सहभाग असला तरीही आपण ‘मेडल’ मिळवूच, असा विश्वास अक्सा हिने व्यक्त केला आहे.

या महत्वपूर्ण कामगिरीमुळे‌ अक्सा हिला आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठीची ‘इंटरनॅशनल ट्रायल’ येत्या मे महिन्यात होणार असून त्याचे ठिकाण लवकरच जाहीर होणार आहे. पण, भविष्यात जगभरात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरणे व ‘सुवर्णपदक’ मिळवणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याची प्रतिक्रिया अक्सा हिने विजयानंतर दिली आहे.

कणकवलीतील पोद्दार इंटरनॅशनल‌ स्कुलची सातवीतील विद्यार्थिनी असलेली अक्सा गेल्या दोन वर्षांपासून सातारा येथेच राहून प्रविण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. तिच्या यशाबद्दल वडील तथा प्रतिथयश शासकीय ठेकेदार मुदस्सर शिरगांवकर आणि आई तथा बचतगटाच्या माध्यमातून प्रभावी कामगिरी करणाऱ्या, अनेक ‌महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या सौ. तन्वीर शिरगांवकर यांनीही समाधान व्यक्त केले आहे. अक्सा हिच्यापासून प्रेरणा घेऊन सिंधुदुर्गातही ‘आर्चरी’चे‌ खेळाडू‌ तयार होतील. तर भविष्यात अक्सा आंतरराष्ट्रीय स्पर्धाही गाजवेल. पालकांनी आपल्या पाल्यांना अभ्यासासह क्रीडा क्षेत्रातही प्रोत्साहन द्यावे. जेणेकरून सिंधुदुर्गातही आंतरराष्ट्रीय पातळीचे खेळाडू तयार होतील, असे‌ आवाहनही मुदस्सर व‌ तन्वीर शिरगांवकर यांनी ‌केले आहे. अक्सा हिच्या यशस्वी कामगिरीचे राज्यभरातील क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Web Title: 12 year old aksa from sindhudurg won the gold medal and dominated the national archery competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 07:23 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.