Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२४ कोटींचा बनावट चेक वटवण्यास आले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले; आठ जणांना अटक, देशभरात सुमारे १० कोटींचा गंडा

चार महिने या रॅकेटच्या मागावर असलेल्या पोलिसांना अखेर यश आलं. या रॅकेटमधील म्होरक्यासह आठ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. देशभरात विविध ठिकाणी या टोळीने तब्बल १० कोटींना गंडा घातला आहे. या प्रकरणात आणखी किती जण सहभागी आहेत याचा मानपाडा पोलीस शोध घेत आहेत.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 05, 2022 | 07:31 PM
२४ कोटींचा बनावट चेक वटवण्यास आले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले; आठ जणांना अटक, देशभरात सुमारे १० कोटींचा गंडा
Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवली : एका बड्या कंपनीच्या नावाने २४ कोटीचा बनावट चेक (Counterfeit Cheque) वटवण्यासाठी डोंबिवलीतील (Dombivli) एका बँकेत आलेल्या तिघांना मानपाडा पोलिसांनी (Manpada Police) ताब्यात घेतलं. इतक्या मोठ्या रकमेचा बनावट चेक पाहून या मागे एखादं रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आला.

चार महिने या रॅकेटच्या मागावर असलेल्या पोलिसांना अखेर यश आलं. या रॅकेटमधील म्होरक्यासह आठ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. देशभरात विविध ठिकाणी या टोळीने तब्बल १० कोटींना गंडा घातला आहे. या प्रकरणात आणखी किती जण सहभागी आहेत याचा मानपाडा पोलीस शोध घेत आहेत.

[read_also content=”लॅपटॉप चोरी करणाऱ्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी केली अटक; ८ लॅपटॉप व एक मारुती स्विफ्ट कार केली जप्त https://www.navarashtra.com/maharashtra/crime-navi-mumbai-police-arrest-accused-of-stealing-laptop-nrvb-233130.html”]

डोंबिवली पूर्व येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत १ ऑक्टोबर २०२१ रोजी तीन जण आले. त्यामध्ये एकाने आपलं नाव  हरीचंद्र कडवे असून मी संत रोहिदास सेवा संस्था वांगणी या  संस्थेचा अध्यक्ष असल्याचे सांगितले. आमच्या संस्थेला इंडोस टॉवर लिमिटेड या मोबाईल टॉवर कंपनीकडून २४ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.असे सांगत हा चेक वटवण्यासाठी दिला. मोठ्या रकमेचा चेक असल्याने याबाबत बँक कर्मचाऱ्यांनी मॅनेजर विशाल व्यास यांना दिली. व्यास याना चेक पाहून संशय आला त्यांनी तत्काळ याबाबत  यांनी मानपाडा पोलिसांना याची माहिती दिली.

मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी श्रीकृष्ण गोरे यांच्या पथकाने घटना स्थळी धाव घेत तत्काळ हरिश चंद्र कडवे व त्याचे दोन साथीदार नितीन शेलार, अशोक चौधरी या तिघांना ताब्यात घेतले. २४ कोटीचा चेक आला होता तो चेक बनावटी होता. मात्र चेकवर जी स्वाक्षरी होती. ती हुबेहूब संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यासारखी होती. चेक बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने या मागे मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी केली. या दरम्यान तिघे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

[read_also content=”Tata Play Fiber: ग्राहकांची चांदीच चांदी 1150 रुपयांचे मोफत हाय-स्पीड ब्रॉडबँड कनेक्शन मिळवा https://www.navarashtra.com/technology/life-more-zingalala-tata-play-fiber-offers-customer-rs1150-plan-for-free-check-how-to-grab-tata-sky-0ffer-know-the-full-details-here-nrvb-233118.html”]

अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय कराळे आणि पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु झाला. या तपासात हरीशचंद्र याला हा चेक मजहार खान यांनी दिला होता.पोलिसांनी मजहर खान याला ताब्यात घेतल्यावर त्याने अनेक ओतारी याने चेक दिल्याचे सांगितले पोलिसांनी अनेकला ताब्यात घेतलं. अनेकने  हा चेक त्याला फारुक उमरने दिल्याचे सांगितले. पोलिसांनी फारुक उमर ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चेक सचिन साळसकर याने दिल्याचे सांगितले. वाढती यादी पाहून पोलिसही चक्रावले होते.

पोलिसांनी विरारहून सचिन साळसकर याला ताब्यात घेतलं त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने भावेश ढोलकिया याने चेक तयार करण्यास सांगितल्याची माहिती दिली. गोरे यांच्या पथकाने या टोळीच्या आठही जणांना समोरासमोर बसवून सखोल चौकशी केली. गुजरात येथे राहणारा भावेश ढोलकिया हा या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे.

[read_also content=”जानेवारीमध्ये विकल्या गेलेल्या टॉप 10 SUV: यापैकी 2 मध्ये टाटा आणि 3 महिंद्राच्या कारचा समावेश आहे, Hyundai आणि Kia च्या कोणत्या मॉडेलची सर्वाधिक झाली विक्री ते जाणून घ्या सविस्तर https://www.navarashtra.com/automobile/india-best-selling-suvs-cars-in-january-2022-updated-from-tata-nexon-to-kia-seltos-mahindra-thar-nrvb-233054.html”]

काही महिन्यापूर्वी त्याची सचिन साळसकर याच्याशी भेट झाली. सचिन साळसकर हा कम्प्युटर मॅकेनिक आहे. तो कोणत्याही कंपनीचा बनावटी चेक ढोलकिया याच्या सांगण्यावर तयार करीत होता. हे चेक वटवण्यासाठी विविध लोकांना शोधून त्यांच्याकडून हे चेक वटवले जात होते.

या प्रकरणाचा मास्टरमाईंड भावेश हा अशाच एका प्रकरणात गुजरातच्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. या बाबत डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे यांनी अशा प्रकारे या टोळीने तामिळनाडू, गुजरात यासह अन्य राज्यातही १० कोटीचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. या प्रकरणात आणखीन कोण सहभागी आहे याचा शोध सुरु आहे.

Web Title: 24 crore counterfeit cheque were cashed and caught by police eight arrested rs 10 crore looted across the country nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2022 | 07:28 PM

Topics:  

  • Cheque

संबंधित बातम्या

Cheque Payments: चेक भरताच काही तासात जमा होणार खात्यात पैसे, 4 ऑक्टोबरपासून RBI ची नवी सिस्टिम
1

Cheque Payments: चेक भरताच काही तासात जमा होणार खात्यात पैसे, 4 ऑक्टोबरपासून RBI ची नवी सिस्टिम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.