8.61 lakh worth of cannabis seized
वर्धा : पांढरकवडा ते नागपूर कडे अवैधरित्या गांजा वाहतूक (Illegal transportation of cannabis) करणा-या ट्रकला दारोडा टोल नाकाजवळ नाकेबंदी करून वडनेर पोलिसांनी (Wadner police) गांजा व ट्रक, असा एकूण ८ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त (8 lakh 61 thousand items confiscated) करण्यात आला असून ट्रकचालक आरोपीला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ९ जुलै रोजीच्या मध्यरात्री दरम्यान बकरी ईद तसेच आषाढी एकादशी सणानिमित्त दरोडा टोल नाला येथे एन. एच. क्र. ४४ रोडवर पोलीस नाकेबंदी करीत होते. दरम्यान, पोलीस निरीक्षक कांचन पांडे (Police Inspector Kanchan Pandey) यांना मुबबीरकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, ट्रक क्र. एम. एच. ४० ए. के. ६६९७ मध्ये दोन व्यक्ती पांढरकवडाकडून नागपूरकडे गांजाची वाहतूक (Transport of cannabis from Pandharkavada to Nagpur) करीत आहे. त्याच माहितीच्या आधारे एन. एच. क्र. ४४ रोडवर नाकेबंदी करीत असताना ट्रक थांबवून ट्रकची पाहणी केली असता त्यात एक काळ्या रंगाच्या बँगमध्ये १५ किलो ६०० ग्रँम गांजा जप्त करण्यात आला.
ट्रकचालक अनिलकुमार श्री जयकरण यादव (२१) (रा. गजरही उन्मुख पोष्ट कुबरी रा. सिंहावल जि. सिंधी) स्टेट मध्यप्रदेश याला अटक करून आरोपीकडून १५ किलो ६०० ग्रम गांजाची किंमत १ लाख ५०० हजार, ट्रक किंमत ७ लाख रुपये व मोबाईल किंमत १० हजार रुपये, असा एकूण ८ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनात वडनेरचे ठाणेदार कांचन पांडे, पोलीस उपनिरीक्षक राजू सोनपितरे, पोलीस कर्मचारी मारोती जांबळे, प्रशांत मेश्राम, राहूल कल्हाणे, सचिन सुरकार, होमगार्ड अमित सोनुले, भूष उगेमुगे आदींनी केली.
दुसरा आरोपी प्रसार
नाकेबंदी दरम्यान पोलीस ट्रकची झडती घेत असताना ट्रकचालक ताब्यात घेण्यात आले असून त्याचा साधीदार अंधाराचा व शेतशिवाराचा फायदा घेवून प्रसार झाला. प्रसार झालेल्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.