Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गाडीचे ब्रेक लागत नाहीत, आम्हाला वाचवा…’; अन् घडलं पुढं असं काही…

जंक्शन (ता. इंदापूर) येथील वृद्ध जोडप्याच्या गाडीचा ब्रेक निकामी झाला. ही बाब वेळीच लक्षात आल्याने संबंधित वृद्धाने आरडाओरड करत याची माहिती दिली. त्यावेळी प्रसंगावधान राखत रियाज नावाच्या एका मुलाने क्षणाचाही विलंब न करता दुचाकी थांबवल्याने वृध्द दाम्पत्याचा जीव भांड्यात पडला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 23, 2022 | 03:13 PM
‘गाडीचे ब्रेक लागत नाहीत, आम्हाला वाचवा…’; अन् घडलं पुढं असं काही…
Follow Us
Follow Us:

निमसाखर : जंक्शन (ता. इंदापूर) येथील वृद्ध जोडप्याच्या गाडीचा ब्रेक निकामी झाला. ही बाब वेळीच लक्षात आल्याने संबंधित वृद्धाने आरडाओरड करत याची माहिती दिली. त्यावेळी प्रसंगावधान राखत रियाज नावाच्या एका मुलाने क्षणाचाही विलंब न करता दुचाकी थांबवल्याने वृध्द दाम्पत्याचा जीव भांड्यात पडला. काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती, असाच काहीसा अनुभव आल्याचे यातून दिसत आहे.

रियाज मुलाणी असे या धाडसी युवकाचे नाव असून, जंक्शन (ता. इंदापूर) येथील रहिवाशी आहे. अवघ्या १७ वर्षांचा असलेला रियाज मुक्त विद्यापीठातून ११ वीच्या वर्गात शिकत आहे. मंगळवारी (दि. २२) नेहमीप्रमाणे रियाज घरातील कामकाजामध्ये कुटुंबियांना मदत करत होता. यावेळी घराच्या समोरील रस्त्यावरून एक वृद्ध दाम्पत्य टीव्हीएस लुना या दुचाकीवरून ओरडत येत असल्याचे त्याला दिसले. ‘गाडीचे ब्रेक लागत नाहीत, आम्हाला वाचवा’, अशी आर्त विनवणी ते जोडपे करत असल्याचे रियाजच्या निदर्शनास आले.

वेगात असणारी दुचाकी थांबवायची कशी? असा विचार सुरुवातीला रियाजच्या मनात आला. मात्र, दुचाकीच्या मागे पळत रियाज याने दुचाकीचे कॅरेज घट्ट धरले. दुचाकी थांबवली. रियाजच्या या प्रसंगावधानामुळे हे वृद्ध दाम्पत्य सुखरूप बचावले. जर ही दुचाकी थांबली नसती तर समोरील इंदापूर-बारामती राज्य महामार्गावर गेली असती. मात्र, रियाजने दाखवलेल्या धाडसामुळे पुढील अनर्थ टळला.

या प्रसंगातून बचावलेल्या वृद्ध दाम्पत्याने देखील ‘बरे झाले लेकरा तू होतास म्हणून आम्ही वाचलो’ अशा शब्दांत रियाजचे आभार मानले. हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, रियाजच्या या धाडसाचे व प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामस्थांच्या वतीने रियाजचा सत्कार करण्यात आला.

मी घराच्या बाहेर साफसफाई करत होतो. एवढ्यात समोरून मला दुचाकीवरून वृद्ध जोडपे येताना दिसले. गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत, असे ते सांगत होते. मला त्या क्षणी जे सुचले ते मी केले. पळत जाऊन गाडीचे कॅरेज मागून घट्ट धरले व गाडी थांबवली.

– रियाज मुलाणी

Web Title: A 17 years boy saves lives of a old age couple in nimsakahar pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2022 | 02:44 PM

Topics:  

  • Old Age Couple
  • Pune

संबंधित बातम्या

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद
1

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार
2

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
3

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक
4

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.