यवतमाळ : विजेचे खांब घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळमधे उघडकीस आली आहे. या अपघातात जितू अमृत राठोड (वय 30, शेकापुर तालुका माहूर) हा जागीच ठार झाला. तर गणेश रामचंद्र चव्हाण ( वय 35, रा. शेकापुर तालुका माहूर) हा व गंभीर जखमी झाला आहे.
[read_also content=”शिवसेनेत हे काय चाललंय!…आता ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्केंचा राजीनामा https://www.navarashtra.com/maharashtra/shivsena-thane-district-chief-naresh-mhaske-resign-from-post-nrps-297065.html”]
सध्या पावसाळ्याचे दिवस असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजे संदर्भातील काम करण्यात येता आहे. तेंडोळी गावातही विजेचे खांब बसवण्याचे काम करण्यात येत होते. आर्णी ते बोरगांव मार्गावर तेंडोळी जवळ शनिवारी विजेचे खांब घेऊन येणारा ट्रक पलटी झाल्याने अपघात घडला. या अपघातात एकाने जीव गमावला असून गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला दाखल करण्यात आले आहे. जखमीवर सध्या आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविले आहे.