Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेतीलच एका खोलीला लागली अचानक आग; पोषण आहार शिजवण्याचे सुरु होते काम

शनिवार आणि रविवारच्या शासकीय सुट्टीनंतर सोमवारी नित्यनेमाने शाळा उघडण्यात आली. शालेय पोषण आहार बनवण्यासाठी मदतनीस महिला कर्मचारी सदर खोलीत गेल्या असता गॅस सुरू करून स्वयंपाक करत होत्या. अचानक सिलिंडर गॅसने पेट घेतला. त्यामुळे आग लागली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 11, 2024 | 08:41 AM
जि. प. शाळेत गॅस सिलिंडरने घेतला पेट

जि. प. शाळेत गॅस सिलिंडरने घेतला पेट

Follow Us
Close
Follow Us:

दिग्रस : तालुक्यातील डोळंबा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील शालेय पोषण आहार शिजविण्याच्या खोलीत असलेल्या गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला. या अचानक झालेल्या घटनेने एकच खळबळ उडाली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही घटना शाळेतच घडल्याने सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.

हेदेखील वाचा : ‘त्या’ चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू; काहीही कारण नसतानाही झाला हल्ला

शनिवार आणि रविवारच्या शासकीय सुट्टीनंतर सोमवारी नित्यनेमाने शाळा उघडण्यात आली. शालेय पोषण आहार बनवण्यासाठी मदतनीस महिला कर्मचारी सदर खोलीत गेल्या असता गॅस सुरू करून स्वयंपाक करत होत्या. अचानक सिलिंडर गॅसने पेट घेतला. त्यामुळे आग लागली. खोलीत लागलेली आग एवढी भयावह होती की, उपस्थितांनी तेथून काढता पाय घेतला. मात्र, जागरूक नागरिकांनी सावधगिरी बाळगत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

निलेश जाधव यांनी तातडीने आर्णी नगर परिषद यांना घटनेची माहिती दिली. अग्निशमन दल पाचारण केले आणि कर्मचाऱ्यांनी आग विझवली. त्यामुळे होणारी संभाव्य हानी टळली. डोळंबा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 1 ली ते 7 वीचे अंदाजे 60 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

दरम्यान, या प्रकारामुळे विद्यार्थी घाबरून गेले होते. अक्षरशः त्यांना सुट्टी द्यावी लागली. संभाव्य हानी टाळण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीने या बाबीकडे जातीने लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली घटनास्थळाला भेट

डोळंबा येथील जिल्हा परिषद शाळेत आग लागल्याची माहिती मिळताच दिग्रस पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार यांनी क्षणाचा विलंब न करता लगेच घटनास्थळ गाठून भेट दिली. सोबत असलेल्या शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यामधून शिक्षण विभागाची कार्यतत्परता दिसून आली.

हेदेखील वाचा : सुप्रीम कोर्टाने दिलेला अल्टिमेटम संपला, तरीही आरजी कार हॉस्पिटलचे डॉक्टर संपावर ठाम, आता पुढे काय?

Web Title: A sudden fire broke out in a room of the school itself incident in digras nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 08:41 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.