Encounter News: आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर खरा की खोटा? ॲडव्होकेट असीम सरोदेंकडून हायकोर्टात याचिका
मुंबई: महाराष्ट्रातील बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला. 23 वर्षीय अक्षयवर शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोजा कारागृहातून बदलापूरला नेत असताना अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावली. यानंतर त्याने गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दिले आणि अक्षय ठार झाला. वरिष्ठ निरीक्षक संजय शिंदे यांच्या गोळीमुळे अक्षयचा मृत्यू झाला. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. दरम्यान हे प्रकरण आता मुंबई हायकोर्टात जाणार आहे. कारण ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांनी हायकोर्टात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.
पोलिसांवर दबाव होता. येथील राजकीय लोकांची प्रतिष्ठा महत्वाची होती आणि त्याला ठरवून स्वतःला मारून घेण्याची परिस्थिती तयार करून देण्यात आली का? आम्ही ऊच्च न्यायालयाच्या लक्षात उद्याच हा सगळे आणून देणार आहोत. — Asim Sarode (@AsimSarode) September 23, 2024
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला आहे. पोलिसांनी स्ववसंरक्षणासाठी केलेल्या हल्ल्यात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. यावर विरोधकांनी संशय व्यक्त केला असून, पोलिसांच्या कारवाईवर शंका उपस्थित केली आहे. सत्ताधार्यांनी देखील विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली आहे. सरकारी वकील यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी होईल असे म्हटले. तर विधीज्ञ असीम सरोदे यांनी या प्रकरणात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
बदलापूर घटनेतील अत्याचारग्रस्त मुलीच्या व तिच्या परिवाराच्या बाजूने वकीलपत्र दाखल केल्यापासून मी एक वेगळाच दबाव बघतोय. आरोपीला जेलमधून थेट न्यायालयात नेणे आवश्यक असतांना त्याला बदलापूर पोलीस स्टेशनला का नेण्यात आले?, पोलिसांची बंदूक साधरणतः लॉक असते ती आरोपीने kashi वापरली? — Asim Sarode (@AsimSarode) September 23, 2024
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी न्यामूर्तींच्या देखरेखीखाली व्हावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करणार असल्याचे असीम सरोदे यांनी सांगितले. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे या तपासातून काय समोर येते हे, पाहणे महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कसा झाला? काय घडलं नेमकं ठाणे पोलिसांचा यथोचित खुलासा
अक्षय शिंदे एन्कांऊटरप्रकरणी ठाणे पोलिसांनी मंगळवारी (24 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ठाणे पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस अधिकारी शैलेश साळवी यांनी सोमवारी घडलेल्या घटनेचा घटनाक्रम सांगितला आहे. बदलापूरचे पोलीस अक्षय शिंदेला कायदेशीर पद्धतीने घेऊन जात असताना, अक्षयने पोलिसांची पिस्तुल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी त्याच्याकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्याचा देखील प्रयत्न झाला आहे. या संदर्भात मुंब्रा पोलीस स्थानकात 307 कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 132/109/131 अन्वये देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय शिंदेसंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे पोलीस आयुक्त करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.